धर्माच्या नावावर देशाचे विभाजन होता नये, ‘या’ भाजप आमदाराचाच सीएएला विरोध

टीम महाराष्ट्र देशा : सीएएला मी माझ्या अंतकरणापासून सीएएला विरोध करत आहे. यामुळे बंधुभाव संपत चालला आहे. लोक एकमेकांना संशयाने पाहत आहेत. मी पक्षाकडे माझे म्हणणे मांडणार आहे. अशी प्रतिक्रिया एका भाजप आमदारानेच केली दिली आहे. देशभरात सीएए आणि एनआरसीच्या विरोधात हिंसाचार माजलेला आहे. देशभरातून या कायद्याविरोधात आंदोलने होत आहे.

मध्य प्रदेशच्या मैहरचे भाजपा आमदार नारायण त्रिपाठी यांनी नागरिकता सुधारणा कायदा (सीएए) ला विरोध केला आहे. सीएए आणि एनआरसीच्या विरोधात बोलताना त्यांनी आपले परखड मत व्यक्त केले आहे. ‘सीएएच्या विरोधात मी पक्षाकडे माझे म्हणणे मांडणार आहे. हे माझे वैयक्तिक मत आहे. सीएए मतांच्या राजकारणासाठी ठीक आहे पण देशासाठी नाही. सीएए आणि एनआरसी ऐवजी देशातील बेरोजगारीवर चर्चा होण्याची आवश्यकता आहे. सीएएमुळे देशातील वातावरण खराब होत आहे.

Loading...

देशात सध्या बेरोजगारीवर विचार करायची गरज आहे, ना ही धर्माच्या आधारावर नागरिकतेचा. धर्माच्या नावावर देशाचे विभाजन होता नये. एकतर तुम्ही संविधानासोबत आहात किंवा विरोधात आहात. जर संविधानाने चालायचे नसेल तर ते फाडून फेकून द्यावे. जर देशाला पुढे न्यायचे असेल तर हा कायदा लागू करू नये, असे मत त्रिपाठी यांनी मांडले.

दरम्यान, एकीकडे भाजपाचे नेते देशभरात सीसीएच्या समर्थनार्थ प्रचार करत असताना भाजपाचाच आमदार विरोधात बोलल्याने अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
महाविकास आघाडीचे 'जनक देवेंद्र फडणवीस' आहेत : शिवाजीराव आढळराव पाटील
गोपीनाथ मुंडेंच्या आग्रहाला 'बळी' पडलो; मोदींवर विश्वास ठेवला, मात्र घडलं 'भलतंच'
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
दणका राज ठाकरेंचा ! औरंगाबादमध्ये 'मनसे गद्दाराची' केली 'हकालपट्टी'