fbpx

बलात्कार प्रकरणी भाजपा आमदारांना अटक

bjp-lotus

टीम महाराष्ट्र देशा : भाजप नेत्यांवर सतत काहीना काही कारणाने चर्चेत येण्याचे सत्र सुरु असते. यात काही वेळा बेताल वक्तव्यांचे प्रमाण असते परंतु आता बलात्कारा सत्र सुरु झाल्याचे चित्र भाजप मध्ये दिसत आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री राजन गोहेन यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा शुक्रवारी दाखल झाल्याच्या पाठोपाठ आसामातील भाजपचे दोन आमदार ‘सेक्स रॅकेट’ मध्ये अडकल्याचे उजेडात आले आहे. या प्रकरणात अमिनुल हक लस्कर आणि किशोर नाथ या दोघा भाजप आमदारांसोबतच ‘एआययूडीएफ’चे आमदार निजामुद्दीन चौधरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली आहे.

आसामातील या सेक्स रॅकेटमध्ये  दुर्देवी पद्धतीने  अडकलेल्या एका महिलेने आपल्या चलाकीने स्वतःची सुटका करून घेतल्यानंतर पोलिसांकडे केलेल्या तक्रारीमुळे हे रॅकेट उजेडात आले. गुन्हा दाखल झालेल्या तीन आमदारांच्या सहभागाने महरपूर येथील पुष्पविहार लेनमधील घरात ते सेक्स रॅकेट सुरू होते, असे त्या महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी हे रॅकेट चालवणाऱ्या एका महिलेला अटक केली आहे.

या प्रकरणात त्या महिलेसह आणखी दोघांना अटक केल्यानंतर तिघांनाही शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले. या सेक्स रॅकेटमध्ये तीन आमदारांचा सहभाग असला तरी त्यांना आरोपीऐवजी ‘ग्राहक’ दाखवण्यात आल्याचे समोर येत आहे.

पालघर बॉम्ब साठा प्रकरण; शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संशयाच्या भोवऱ्यात

 

 

3 Comments

Click here to post a comment