भाजप आमदारावर बलात्काराचा आरोप

बलात्कार

बीड: एका महिलीने बीड जिल्ह्यातील एका भाजप आमदाराने आपल्यावर बलात्कार केल्याची तक्रार केली आहे. तक्रार करूनही पोलीस न्याय देत नसल्यामुळे सदर महिलेने पोलीस अधीक्षक कार्यालय गाठलं. घटनेचं गांभीर्य ओळखून विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे या तक्रारीची चौकशी करण्यासाठी शनिवारी बीडमध्ये दाखल झाले आहेत.

बीड येथील एका दांपत्याने आपल्या मुलाला कायमची नोकरी मिळावी, म्हणून भाजप आमदारासोबत सुनेला अनैतिक संबंध ठेवण्यास भाग पाडलं, अशी तक्रार या महिलेने बीडच्या पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. या तक्रारीमध्ये भाजप आमदाराविरोधातही बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. आमदार सत्ताधारी पक्षाचे असल्यामुळे विशेष पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे बीडमध्ये तळ ठोकून आहेत.