fbpx

#महापूर : राष्ट्रवादी पाठोपाठ भाजपचे आमदार खासदारही देणार पूरग्रस्तांना एक महिन्याचे वेतन

टीम महाराष्ट्र देशा : सतत पडणाऱ्या पावसामुळे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात नद्यांना पूर आल्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेले आहे. तसेच नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेले आहे. तसेच या पूरग्रस्तांसाठी सरकार सर्वतोपरी मदत करताना दिसत आहे. तसेच पूरग्रस्त भागाच्या विकासासाठी विविध सामाजिक संस्थांनीही पुढाकार घेतलेला दिसत आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व मंत्री आपला एक महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीला देऊन पूरग्रस्तांना मदत करणार आहेत. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे.

अतिवृष्टीमुळे कोल्हापूर सांगलीला आलेला महापूर हा भयंकर होता. या महापुरात नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. नागरिक अन्न , वस्त्र , निवारा या मुलभूत गरजांपासून वंचित आहेत. नागरिकांना आर्थिक फटका बसलाचं आहे. त्यात आता महापुरामुळे रोगराई पसरू लागली आहे. या हलाखीच्या परिस्थितीत पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी अनेकांनी पुढाकार घेतला आहे. अनेक सेवाभावी संस्था पुढे आल्या आहेत. मदत करत आहेत. एका बाजूने प्रशासकीय मदत केली जात आहे. तर अनेक नेत्यांनी वैयक्तिक स्तरावर देखील मोठी आर्थिक मदत केली आहे.

अनेक राजकीय पक्षांकडून आर्थिक मदत करण्यात आली आहे. अनेक आमदार, खासदार , नगरसेवक , महापौर यांनी आपले एक महिन्याचे वेतन पूरग्रस्तांना देण्याचा निर्णय घेतला आहे. तर भाजपा लोकप्रतिनिधींनी एक महिन्याचं वेतन पूरग्रस्तांना द्यावं अशी सूचना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे तर शिवसेनेकडूनही नगरसेवक, आमदार, खासदार यांचे एक महिन्याचं वेतन पूरग्रस्तांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या