भाजप तुझी रीतच न्यारी ! बलात्काराच्या आरोपींचं समर्थन करणाऱ्या आमदाराला मंत्रिपदाचंं बक्षीस

टीम महाराष्ट्र देशा : कठुआ सामूहिक बलात्कारातील आरोपीच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये सहभाग घेतलेल्या आमदाराला भाजपने मंत्रिपदाचे बक्षीस दिले आहे. भाजपा आणि पीडीपी सरकारचा 30 एप्रिल रोजी मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला. त्यात आमदार राजीव जसरोटिया यांना मंत्री बनवण्यात आलं आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये चर्चित असलेल्या कथुआ सामूहिक बलात्कारातील आरोपींच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या रॅलीत राजीव जसरोटिया दिसले होते. तरीही त्यांना मंत्री बनवण्यात आलं आहे. टाइम्स नाऊ या वृत्तवाहिनीनं यासंदर्भात राजीव जसरोटिया यांना काही दिवसांपूर्वी प्रश्नही विचारला होता. त्यावेळी मी रॅलीत सहभागी झालो नसल्याचं जसरोटिया यांनी सांगितलं होतं.

1 Comment

Click here to post a commentLoading…
Loading...