पुण्याचा ‘वशाटोत्सव’ नागपूरच्या अधिवेशनात, आता थेट सुरेश धसांनाच बकऱ्याचं आवतण

पुणे: सोशल मिडीयाच्या अभाशी जगामध्ये भेटलेल्या काही युवकांनी वर्षातून एकदातरी प्रत्यक्षात भेटता यावं यासाठी सुरु केलेला वशाटोत्सव सध्या चांगलाच भाव खावून जात आहे, याला कारण ठरले आहे ते भाजप आमदार सुरेध धस यांनी वशाटोत्सवावर प्रश्नचिन्ह निर्माण करत विधानसभेत केलेलं वक्तव्य.

झाल असं कि, काल सभागृहातील चर्चे दरम्यान पुण्यामध्ये आयोजित करण्यात येणारा वशाटोत्सव हा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या फेक अकाउंटसाठी आयोजित केला जात असल्याचा आरोप धस यांनी केला. यानंतर आता सोशल मिडीयावर धस यांना मोठ्या प्रमणात ट्रोल केल जात आहे, तसेच नेमकं वशाटोत्सव आहे काय हे बघण्यासाठी या म्हणत थेट सुरेश धसांनाच बकऱ्याच आवतण देण्यात आलं आहे.

देशभरात लागू करण्यात आलेल्या बीफबंदीनंतर सर्व धर्मीय आणि वेगवेगळ्या पक्षांमध्ये काम करणाऱ्या मित्रांनी राजकीय जोडे बाजूला ठेवत वशाटोत्सवाला सुरुवात केली, आजवर दोन वेळा याच आयोजन करण्यात आलं आहे. सुरेश धस यांनी काल विधानपरिषदेत सोशल मिडिया संबंधीत विषयावर सुरु असलेल्या चर्चे दरम्यान बोलत असतांना वशाटोत्सव हा राष्ट्रवादीच्या फेक अकाउंटसाठी आयोजित केला जात असल्याचा आरोप केला आहे.

दरम्यान, एकदा सोशल मिडीयावर सुरु असणाऱ्या चर्चे दरम्यान वर्षातून एकदातरी प्रत्यक्षात भेटता यावं यासाठी काय करता येईल यावर बोलण सुरु असतांना वशाटोत्सवाची कल्पना सुचली, त्यानंतर सर्व जातीधर्म, वेगवेगळ्या पक्षातील मित्रांनी एकत्र येत दोन वशाटोत्सव यशस्वीपणे पार पाडले. मात्र, आता हा कार्यक्रम एका पक्षाशी निगडीत असल्याचं वक्तव्य बदनाम करण्यासाठी करण्यात आलं आहे, वशाटोत्सवाचे दरवाजे हे नेहमीच सगळ्यांसाठी उघडे असतात. पक्ष, धर्म, पंथ सारख्या गोष्टी सहभागी होणारे मित्र आपल्या घरी ठेवून येत असल्याचं वशाटोत्सवाची सुरुवात करणाऱ्या मोहसीन शेख याने सांगितले.