‘सोनिया गांधी या इटलीत आधी सपना चौधरीसारखचं काम करायच्या’

टीम महाराष्ट्र देशा- डान्सर सपना चौधरीने शनिवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याची चर्चा आहे. यापार्श्वभूमीवर भाजपचे आमदार सुरेंद्र सिंग यांनी सपना चौधरीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलंय. राहुल गांधी यांनी सपनाला अपना करावं आणि राजकाणाची नवी सुरुवात करावी अशी मुक्ताफळे सिंग यांनी उधळली आहेत.

सपना चौधरी या प्रसिद्ध अभिनेत्री हेमामालीनी यांच्या विरोधात मथुरा लोकसभा मतदार संघातून लढणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. या पार्श्वभूमीवर सिंग याचं हे वक्तव्य आलं आहे. पुढे बोलताना सोनिया गांधी या इटलीत आधी सपनासारखच काम करायच्या. राजीव गांधी यांनी त्यांच्याशी लग्न केलं. त्यामुळे आता राहुल गांधी यांनीही सपनाची लग्न करावं असा फुकटचा सल्ला देखील सिंग यांनी देवून टाकला.

Loading...

दरम्यान, सुरेंद्र सिंग यांच्यावर या वक्तव्यामुळे चौफेर टीका होऊ लागली आहे. महिलांचा अपमान भाजपकडून केला जात असल्याचा आरोप केला जात आहे. दरम्यान,सपना चौधरी हिने काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याच्या चर्चांना उधान आलेले असताना आतासपनाने आपण कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश केला नसल्याचे स्पष्ट करत सर्वांनाच आश्चर्य करायला भाग पाडले. तिच्या या गौप्यस्फोटामुळे तिचा काँग्रेसमधील प्रवेश याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. माध्यमांशी बोलताना आपण कोणत्याही पक्षात प्रवेश केला नसल्याचे तिने स्पष्ट केले.