भाजप आमदार शिवाजी कर्डिलेंची रवानगी न्यायालयीन कोठडीत

शिवाजी कर्डिले

अहमदनगर: पोलीस अधीक्षक कार्यालय तोडफोड प्रकरणी अटकेत असणारे भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. कर्डिले यांना आज न्यायालयात हजर करण्यात आल होत. यावेळी कर्डिले यांच्यासह इतर १७ जणांना न्यायालयीन कोठडीचे आदेश देण्यात आले आहेत.

शिवसैनिकांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी राष्ट्रवादी आमदार संग्राम जगताप यांना चौकशीसाठी बोलवले होते. मात्र शिवाजी कर्डिले यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह अधीक्षक कायार्लायत येत दगडफेक करुन, कार्यालयाचे दरवाजे लाकडी दांडक्याने तोडून सार्वजनिक मालमत्तेच नुकसान केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.