शिवसैनिक हत्याकांड : भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांना एका दिवसाची पोलीस कोठडी

शिवाजी कर्डिले

अहमदनगर : अहमदनगर शिवसेना शहर उपप्रमुख संजय कोतकर आणि वसंत ठुबे हत्या प्रकरणानंतर पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात तोडफोडप्रकरणी भाजपचे शिवाजी कर्डिले यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आमदार शिवाजी कर्डिले यांना एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

दरम्यान, शिवसेना शहर उपप्रमुख संजय कोतकर आणि वसंत ठुबे हत्या प्रकरणात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं असताना संग्राम जगताप यांच्या समर्थकांनी पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात धुडगूस घालत तोडफोड केली होती. या तोडफोडीत संग्राम जगताप यांचे सासरे आणि भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले हे देखील सामील असल्याच्या आरोपात त्यांना आज सकाळी अटक करण्यात आली होती त्यांनतर कर्डिले यांना एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

संग्राम जगताप यांचे वडील आणि आमदार अरूण जगताप यांनाही अटक करावी अशी मागणी शिवसैनिकांनी पुन्हा एकदा केली. त्यासाठी रात्री पुन्हा रास्तारोको करण्यात आला. त्यानंतर केडगावात अंत्यसंस्कार कऱण्यात आले. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. या अंत्यसंस्कारांनंतर आज अहमदनगरमध्ये तणावपूर्ण शांतता आहे.