एका तरुणीकडून भाजप आमदार राम कदम यांना ओपन चॅलेन्ज….

भाजपचे आमदार राम कदम यांनी दहीहंडीच्या उत्सहात घाटकोपर येथे बेताल वक्तव्य केलं होतं, यावर आता एका तरुणीने राम कदम यांना चॅलेन्ज केलं आहे. या मुलीने हे आव्हान देताना त्याचा व्हिडीओ काढून सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.  हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.या मुलीचं नाव मीनाक्षी पाटील असून ती पुण्याची आहे.

“घाटकोपर दहीहंडी उत्सवामध्ये राम कदम यांनी एक चॅलेन्ज केला, तुम्हाला मुलगी आवडली का मला एक कॉल करा, मी तिला उचलायला मदत करतो, राम कदम मी तुम्हाला चॅलेन्ज करतेय, मला तुम्ही मुंबईत बोलवा किंवा मी मुंबईमध्ये येते, मला तुम्ही फक्त एक बोट लावून दाखवा, बाकी पुढंच उचलून न्यायची गोष्ट मी नंतर बघते.” अशा शब्दात या मुलीने राम कदम यांना आव्हान केल आहे.

अजून काय म्हणाली हि मुलगी पहा या व्हिडीओ मध्ये