वडिलांकडून जीवाला धोका ; दलित मुलाशी लग्न केलेल्या आमदार कन्येच्या व्हिडीओने खळबळ

टीम महाराष्ट्र देशा : उत्तर प्रदेशमधील भाजपचे आमदार राजेश मिश्रा यांच्या मुलीने एक व्हिडियो सोशल मिडीयावर शेअर केला आहे. शेअर केलेया व्हिडियोत वडील आमदार राजेश मिश्रा यांच्याकडून जीवाला धोका असल्याचे म्हंटले आहे. राजेश मिश्रा यांची मुलगी साक्षी मिश्रा हिने कुटुंबियांच्या विरोधात जात एका दलित तरुणाशी लग्न केले आहे.

आमदार राजेश मिश्रा यांची मुलगी साक्षी मिश्रा हिने काही दिवसांपूर्वी कुटुंबियांच्या विरोधात जात अजितेश कुमार या दलित तरुणाशी पळून जाऊन लग्न केले होते. दरम्यान कुटुंबियांच्या विरोधात जात एका दलित मुलाशी लग्न केल्यामुळे वडिलांनी आपल्याला मारायला गुंड पाठवल्याचं साक्षी निश्रा हिने म्हंटले आहे.

साक्षी मिश्रा हिने सोशल मिडीयावर एक व्हिडियो शेअर केला आहे. त्या व्हिडियोत पप्पा, तुम्ही राजीव राणाप्रमाणे माझ्यामागे गुंड पाठवलेत. आमचा जीव धोक्यात आहे. अभी आणि त्याच्या नातेवाईकांना त्रास देणं थांबवा. मला आनंदी राहायचं आहे, शांततेत जगू द्या, असे साक्षी हिने म्हंटले.

इतकेच नव्हे तर भविष्यात जर मला तसेच अभी किंवा त्याच्या कुटुंबाला काही झालं तर यासाठी माझे वडील भाऊ आणि राजीव राणा जबाबदार असतील. जे माझ्या वडिलांना मदत करत आहेत, असेही तिने म्हंटले. याचबरोबर राजीव राणा यांनी मदत करणं थांबवा’ असंही साक्षीने म्हटलं आहे.

तसेच आपल्या कुटुंबियांकडून जीवाला धोका असल्याने पोलीस सुरक्षा देण्यात यावी अशी मागणीही साक्षीने केली आहे.