‘नाणार’ प्रकल्पाचे समर्थन करण्यासाठी आलेल्या भाजपच्या आमदारावर ग्रामस्थ आक्रमक

टीम महाराष्ट्र देशा : पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनानिमित्त हेलियम डे साजरा न करता विजयदुर्ग येथील भाजप कार्यालयात जाऊन श्रद्धांजली अर्पण करण्याचा निर्णय तेथील ग्रामस्थांनी घेतला होता.  दरम्यान यावेळी विजयदुर्ग किल्ल्यावरील ‘हेलियम डे’चे निमित्त करीत नाणार रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन करण्यासाठी आलेल्या भाजपच्या माजी आमदार प्रमोद जठार यांना गिर्ये-रामेश्वरमधील संतप्त ग्रामस्थांचा चांगलाच फटका बसला.

दरम्यान, यावेळी ग्रामस्थ आक्रमक झाले आणि जठार यांची गाडी विजयदुर्ग येथे जात असताना गिर्ये या ठिकाणी अडवली. आणि पुढ न जाऊन देण्याचा निर्धार करून ‘जमीन आमच्या हक्काची… नाही कोणाच्या बापाची’, ‘रिफायनरी हटाव, कोकण बचाव’ अशा घोषणा ग्रामस्थांनी यावेळी दिल्या. संतप्त ग्रामस्थांना पाहून जठार तेथूनच परतले. याचवेळी जठार विजयदुर्ग येथे येणार असतील तर त्यांना काळे झेंडे दाखवण्याचा निर्णय ग्रामस्थ व संघर्षच्या वतीने आधीच घेण्यात आला होता.

‘खळ्ळ-खटॅक’ : मनसेने नाणार प्रकल्पासाठी काम करणारं कार्यालय फोडलं

You might also like
Comments
Loading...