गंगापूर तालुक्याच्या दुर्दशेस भाजप आ. प्रशांत बंबच जबाबदार; राष्ट्रवादीची आरोप!

prashant bamb

औरंगाबाद : गंगापूर तालुक्यात एकही जबाबदार अधिकारी मुख्यालयाच्या ठिकाणी राहत नाही. तालुक्यातील रस्त्यांची अक्षरशः चाळणी झाली आहे. आ.बंब यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला टोका ते देवगाव हा छप्पन कोटींचा रस्ता पहिल्याच पावसात वाहून गेला. इतर रस्त्यांच्या कामातले कोट्यवधी रुपये अधिकारी, ठेकेदार आणि लोकप्रतिनिधी यांच्या अभद्र युतीमुळे मातीत गेले. मात्र याकडे लक्ष द्यायला आमदार बंब यांना वेळ नाही. मात्र नांदेड, जालना मतदारसंघा बाहेरील रस्त्यांच्या बाबतीत त्यांना एवढी जागरूकता कशी? अशी टिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष वाल्मिक शिरसाठ यांनी आ. प्रशांत बंब यांच्यावर केली आहे.

बंब यांच्या राज्यात पाच महिन्यांपासून गंगापूरला कायमस्वरूपी तहसीलदार नाही. नगर परिषदेला मुख्याधिकारी नाही, सार्वजनिक बांधकाम विभागात वर्षभरापासून उपअभियंता नाही, आरोग्य विभाग, भूमी अभिलेख ही कार्यालये कनिष्ठ दर्जाचे अधिकारी प्रभारी म्हणून कारभार हाकत आहे. वरिष्ठ अधिकारी मुख्यालयी राहत नाही. मात्र या सर्वांकडे आमदार प्रशांत बंब यांचे दुर्लक्ष झाले आहे. आपला मतदार संघ सोडून नांदेड, जालना इतर मतदार संघातील रस्त्याकडे त्यांचे बारीक लक्ष असते.

मात्र गंगापूर तालुक्याची दुर्दशा होण्यास बंबच जबाबदार असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिरसाट यांनी केला आहे. ग्रामसेवक मंडळ, अधिकारी, तलाठी तसेच इतर शासकीय कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहावे, अशा सूचना आ. प्रशांत बंब यांनी दिल्या होत्या. मात्र त्यांच्या सूचनेनंतर ही अधिकारी मुख्यालय परतलेले नाही. त्यामुळे गंगापूर विभागातील नागरिकांची मोठी कामे रखडलेली आहेत. अशी परिस्थिती असतांना आ. बंब हातावर हात धरुन बसले असल्याची टिका राष्ट्रवादीकडून करण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या