मी गृहमंत्री असतो तर ‘त्यांना’ गोळ्या घातल्या असत्या ; भाजप आमदाराचे मुक्ताफळे

टीम महाराष्ट्र देशा : जर मी गृहमंत्री असतो, तर बुद्धिजीवी लोकांना गोळ्या मारण्याचे आदेश दिले असते असे वादग्रस्त वक्तव्य कर्नाटकमधील भाजपचे आमदार बसनगौडा पाटील यांनी केलं आहे. तसेच उदारमतवादी आणि बुद्धिजीवी हे देशद्रोही असल्याचे पाटील म्हणाले. नुकतेच कर्नाटकमध्ये पार पडलेल्या निवडणुकीत पाटील हे विजयपूर विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत.

कारगिल विजय दिवसानिमित्त आयोजित आदरांजली कार्यक्रमात बोलताना भाजप आमदार बसगौडा पाटील यांचा तोल सुटला. बुद्धिजीवी लोकांकडून भारतीय सैन्याविरोधात नारेबाजी केली जाते. तर या लोकांकडून देशातील सर्वच सुविधांचा लाभ घेण्यात येतो, ज्यासाठी आपण टॅक्स देतो. सध्या देशाला धोका या बुद्धिजीवी आणि धर्मनिरपेक्ष लोकांपासून असल्याचेही पाटील यावेळी म्हणाले.

मराठा आरक्षणासाठी राष्ट्रवादीच्या आमदाराचा राजीनामा

You might also like
Comments
Loading...