समाजात दुही निर्माण करण्याचे पाप पवारांनी आता थांबवावं – भाजप आमदार

sharad-pawar 1

टीम महाराष्ट्र देशा- तिहेरी तलाकचं समर्थन करणारे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर भाजपकडून हल्ले सुरूच आहेत. कल्याण (प)चे भाजप आमदार नरेंद्र पवार यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून शरद पवार यांनी वेळोवेळी बदललेल्या भूमिकांवरून टीकेची झोड उठवली आहे. एकेकाळी हमीद दलवाई सारख्या प्रखर बुद्धिप्रामाण्यवादी व्यक्तीच्या पाठीशी ठामपणे उभे राहणारे शरद पवार काळाच्या ओघात मतांचे सौदागर म्हणून टप्प्याटप्प्यावर किती विखारी पद्धतीने रंग बदलत गेले याचा विचार समाजानं करणे गरजेचा आहे असं त्यांनी या पोस्ट मध्ये म्हटलं आहे तसेच पडद्यामागे एक भूमिका आणि पडद्यासमोर एक भूमिका मांडत समाजात दुही निर्माण करण्याचे पाप पवारांनी आता थांबवावं असा सल्ला देखील नरेंद्र पवार यांनी शरद पवार यांना दिला आहे.

नेमकं काय म्हणाले होते शरद पवार
आज ट्रिपल तलाकचा मुद्दा काढला जातोय. मुस्लिम भगिनींना खरंच न्याय द्यायचा असेल तर मुस्लिम समाजातील ज्येष्ठ नेते, धर्मगुरु यांना विश्वासात घेऊन पावले टाकावीत. तलाक हा कुराणने दिलेला संदेश आहे. त्या संदेशात हस्तक्षेप करण्याचा अधिकार कुठल्याही राज्यकर्त्यांना नाही. तुम्ही कुणाच्या धर्मात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करत असाल तर त्याला आम्ही पाठिंबा देणार नाही .

Loading...

narendra pawar vs sharad pawar

कल्याण (प)चे भाजप आमदार नरेंद्र पवार यांची फेसबुक पोस्ट जशीच्या तशी
#रंग_बदलणारे_शरद_पवार…!
शरद पवारांनी डल्लाबोल आंदोलनात औरंगाबादच्या सभेत तलाक हा कुराणचा आदेश आहे असं सांगून आपली खरी ओळख तमाम महाराष्ट्राला करून दिली. कोकणातल्या चिपळुन जवळील मिरजोली इथल्या हमीद दलवाईनी आयुष्यभर पत्नी मेहरुन्नीसा दलवाई यांना सोबत घेऊन तीन तलाकच्या विरोधात रणशिंग फुंकलं, मुस्लीम सत्यशोधक सभेची स्थापना करून या जंजाळातून समाज मुक्त करण्यासाठी केवळ ५ जणांचा पहिला मोर्चा काढला. त्यावेळी मंत्री असणारे शरद पवार भरभक्कमपणे हमीद दलवाईच्या पाठीशी उभे राहिले. एकेकाळी हमीद दलवाई सारख्या प्रखर बुद्धिप्रामाण्यवादी व्यक्तीच्या पाठीशी ठामपणे उभे राहणारे शरद पवार काळाच्या ओघात मतांचे सौदागर म्हणून टप्प्याटप्प्यावर किती विखारी पद्धतीने रंग बदलत गेले याचा विचार समाजानं करणे गरजेचा आहे.

१९६७ च्या दरम्यान हमीद दलवाई व्यापक प्रमाणात तीन तलाकच्या विरोधात लढत होते, आंदोलन, मोर्चे, निषेध करत होते. मुस्लीम समाजाचा काहीअंशी पाठींबा त्यांना मिळत होता. मात्र तेव्हा शरद पवारांचा प्रचंड आणि भक्कम पाठींबा हमीद दलवाईना होता. हमीद दलवाई किडनीने त्रस्त झाले डायलेसीस करावं लागायचं म्हणून त्यांच्या निवासाची सोय शरद पवारांच्या आउटहाउसमध्ये केली होती. एवढंच नाही तर जसलोक हॉस्पिटलला त्यांना अॅडमीट केले आणि त्याचा संपूर्ण खर्च शरद पवारांनी स्वतः केला होता. हे सगळं कशासाठी तर तीन तलाक बंद झाला पाहिजे आणि त्यासाठी ते लढताहेत याचा आनंद होता. उपचारादरम्यान शरद पवारांना हमीदजींनी बोलावून घेतलं आणि त्यांना माझं निधन झाल्यानंतर मला दफन करू नका तर अग्नी द्या अशी विनंती शरद पवारांना केली होती. कालांतराने हमीद दलवाई याचं निधन झालं अन त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांना अग्नी दिला गेला. हे सगळं भूतकाळात असतानाही आता सत्तेसाठी तलाक कुराणाचा आदेश म्हणणं कितीपण योग्य आहे ?

शरद पवारांचं बेभरवशी राजकारण असेल, विदेशी वंशाचा मुद्दा असेल किंवा मराठा जातीचे राजकारण आणि ब्रिगेडी संघटन करून तथाकथित पुरोगामित्वाची झूल असेल हे सगळं शरद पवारांना त्या त्या वेळी बदलावी लागलेली भूमिका आहे. मात्र हे सगळं दिल्लीपर्यंत राजकारण करणारे नेते अचानक इतकी अत्यंत चुकीची आणि समाजाला यातना होतील अशी भूमिका मांडतात तेव्हा लक्षात येते की राष्ट्रवादीचे धोरण हे मुस्लीम महिलांच्या बाबतीत किती गलिच्छ आणि विखारी आहे. “तलाक हा कुराणचा आदेश, त्यात हस्तक्षेप करण्याचा राज्यकर्त्यांना अधिकार नाही.” अशी सोयीस्कर भूमिका मांडून मोकळे झालेले शरद पवार यांना मुस्लीम समाज आगामी काळात योग्य पद्धतीने उत्तर देईलच. मात्र २६ जानेवारीला संविधान बचाव म्हणत मांडलेला खेळ वेगळ्याच बाजूला फसला आहे.

खरंतर आता सत्तेत नसल्याने शरद पवारांचं मानसिक संतुलन ढळलेलं आहे. काल तलाकला विरोध करणाऱ्याच्या जोडीला खंभीरपणे उभं राहणारा माणूस आज तलाक पद्धती बरोबर आहे म्हणतो हे चांगुलपणाचं लक्षण नाही. मुस्लीम महिलांना होणाऱ्या अन्याय आणि अत्याचारावर शरद पवारांनी मीठ चोळलं आहे. पडद्यामागे एक भूमिका आणि पडद्यासमोर एक भूमिका मांडत समाजात दुही निर्माण करण्याचे पाप पवारांनी आता थांबवावं. आजही सत्तेत नाहीत आणि उद्याही निश्चितपणे नसालच. गलिच्छ दर्जाचं आणि जातीयवादाचे राजकारण हे आपण करत आलात हे आता महाराष्ट्राला समजते आहे. विकासाचं राजकारण करण्याची जबाबदारी भाजपने घेतली आणि ती भक्कमपणे पार पाडतो आहोत हेच तुमचं दुखणं आहे. असे हजार हल्लाबोल केले तरी जनता तुम्हाला १५ वर्षे गल्ला भरलेला हिशोब मागणारच आहे हे विसरू नका.

 नरेंद्र बाबुराव पवार
भाजपा आमदार, कल्याण (प)

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार
...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
महाविकास आघाडीचे 'जनक देवेंद्र फडणवीस' आहेत : शिवाजीराव आढळराव पाटील
इंदुरीकर-देसाई वादात आता 'भोर' महाराजांची ऊडी ; देसाईंना कापून टाकण्याची धमकी
...अन्यथा इंदोरीकरांच्या तोंडाला काळं फासू; असा इशारा देणाऱ्या तृप्ती देसाईंवर मनसेच्या रणरागिणीचा प्रतिइशारा
गोपीनाथ मुंडेंच्या आग्रहाला 'बळी' पडलो; मोदींवर विश्वास ठेवला, मात्र घडलं 'भलतंच'
कुख्यात चंदन तस्कर वीरप्पनच्या मुलीचा भाजपमध्ये प्रवेश
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई