बीड : भारतीय जनता पक्षाच्या केज-अंबाजोगाई विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी अल्पावधीतच विविध प्रश्नांना हात घालत ते मार्गी लावलेत. अशाच एका बाबतीत त्यांनी पाठपुरावा करताच तो प्रश्नही निकाली लागला आहे.
अंबाजोगाई वसुंधरा महिला तालुका दूध संघ व परळी तालुका दूध संघाचे एक डिसेंबरपासून शासनाकडे दोन कोटी रुपये थकले होते. त्यामुळे मुंदडा यांनी दुग्धविकासमंत्र्यांकडे पाठपुरावा करून दोन्ही दूध संघांना मार्चअखेरपर्यंतचे साडेतीन कोटी रुपये मंजूर करून घेतले आहेत.
बीड जिल्ह्यातील आष्टी, कडा, पाटोदा, गेवराई व बीड तालुका व जिल्हा दूध संघ अस्तित्वात आहेत. त्यांनी स्वतःचा प्रकल्प उभा करून दुधाची विल्हेवाट लावत आहेत. १ डिसेंबरपासून दोन्ही संघांची जवळपास २ कोटी रुपयांची बिले शासनाकडे थकली होती. ही बिले वेळेत न मिळाल्यामुळे दुग्ध उत्पादक शेतकरी व दूध संघ चालक मोठ्या अडचणीत सापडले होते.
एकीकडे शासन निधीची कमतरता असल्याचे सांगत असले तरी दूध हे जीवनावश्यक वस्तू असल्यामुळे खरेदी केलेली दुधाची बिले वेळेत उपलब्ध करून देण्याचे गरजेचे आहे. वसुंधरा महिला तालुका दूध संघाचे १२ फेब्रुवारीपर्यंत १ कोटी ५० लाख रुपये तर परळी तालुका दूध संघाचे ७० लाख रुपये असे मिळून दोन कोटी वीस लाख रुपये शासनाकडे थकले होते.
आमदार नमिता मुंदडा यांनी स्वतःच्या पत्राद्वारे दुग्धविकासमंत्री सुनील केदार यांची भेट घेऊन दोन्ही संघांची दुधाची बिले अदा करण्याबाबत मागणी केली. केदार यांनी मागणीची दखल घेऊन केदार यांनी अंबाजोगाई व परळी दोन्ही दुग्ध संघांच्या मार्च अखेरपर्यंत साडेतीन कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- अहो दानवेजी, मुख्यमंत्र्यांनी सांगितलेले ऐकायचं नाही असं ठरवलं काय?
- ‘डिसीसी’साठी धनंजय मुंडेंनी बीडमध्ये तळ ठोकले
- खळबळजनक! लातूरात एकाच शाळेतील ४० विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण
- देवीच्या गावात महिला उपेक्षित! नगराध्यक्षपद महिलेसाठी राखीव, पण पदावर पुरूष विराजमान
- लाचखोर उपजिल्हाधिकारी गायकवाडचा जामीन फेटाळला, कोठडीत रवानगी