मुस्लिमांनी राम मंदिर बांधण्यास विरोध केला तर आम्ही हज यात्रा थांबवू

brijbhushan rajput conterversial statement

वेबटीम : भाजपा नेत्यांची मुस्लिमांविरोधी आक्षेपार्ह वक्तव्यांची मालिका थांबताना दिसत नाहीये . ‘देशातील मुस्लिमांनी राम मंदिर बांघण्याच्या आड येऊ नये मुस्लिमांनी जर राम मंदिर बांधण्यास विरोध केला तर आम्ही त्यांना मक्का – मदिनेस जाऊ देणार नाही’, असे विखारी वक्तव्य भाजपाचे उत्तर प्रदेशातील आमदार बृजभूषण सिंह उर्फ गुड्डू राजपूत यांनी केले आहे. 

 उत्तर प्रदेशमधील चरखारी विधानसभा मतदार संघातून निवडून आलेल्या बृजभूषण सिंह यांनी फेसबूक पोष्टमधून हे आक्षेपार्ह विचार मांडले आहेत.  ते म्हणतात, “येत्या काळात आम्ही सर्व 100 कोटी हिंदू मिळून निश्चितपणे राम मंदिर बांधू. हिंदूंनी आता राम मंदिर बांधण्याचा संकल्प केला पाहिजे. जर राम मंदिराच्या बांधकामात मुस्लिमांनी अडथळा आणला. तर त्यांनासुद्धा मक्का आणि मदिनेस जाण्यापासून रोखण्याचे काम हा गुड्डू राजपूत करेल. आम्ही त्यांच्याविरोधाच बोलत नाही. प्रत्येक गोष्टीत आम्ही त्यांना साथ देतो. पण ही मंडळी हिंदूंच्या प्रत्येक सणात अडथळा आणण्याचा प्रयत्न करतात.” या संदर्भातील वृत्त नवभारत टाइम्सने प्रकाशित केले आहे. 

 सरकार हज यात्रेवर सब्सिडी देते. आम्ही यांच्या यात्रेस विरोध करत नाही. तर हजला जाणाऱ्यांचे फुलांच्या माळा घालून स्वागत करतो. जर आम्ही त्यांच्याशी असे वागत असू तर आमचे आराध्य श्री राम यांचे मंदिर बांधू देणे हे यांचे कर्तव्य आहे, असेही भाजपा आमदारांनी पुढे म्हटले आहे.