भाजप आमदाराच्या नवीन प्रस्तावामुळे पुन्हा निर्माण होणार’ शिवजन्माचा’ वाद

Shivaji maharaj

नागपुर: शिवाजी महाराजांच्या तिथीवरुन पुन्हा एकदा राजकारण तापण्याची शक्यता आहे. भाजपचे इचलकरंजीचे आमदार सुरेश हाळवणकर यांनी १९ फेब्रुवारी ऐवजी ८ एप्रिल ही जन्मतारीख निश्चित करण्यासाठी समिती नेमण्याची मागणी केल्याने विधानसभेत विरोधकांनी प्रचंड गदारोळ केला.

शिवाजी महाराजांची राज्यात दोनदा जयंती साजरी होते. महाराजांची जयंती एकाच दिवशी साजरी व्हावी, महाराजांचा जन्म 8 एप्रिल 1630 चा आहे, याला काही संशोधकांच्या संशोधनाचा आधार असल्याचे हाळवणकर यांनी सांगितले. त्यामुळे सरकारने संशोधकांची समिती नेमून एकाच दिवशी महाराजांची जयंती साजरी करावी, अशी मागणी त्यांनी केली.

शिवाजी महाराजांच्या जयंतीची तारीख निश्चित झाली असताना आता पुन्हा जन्मतारखेचा वाद का निर्माण करता, असा आक्षेप विरोधकांनी केला आहे. व सभागृहात गोंधळ घातला आहे. त्यामुळे शिवाजी महाराजांच्या तारखेवरुनवाद पुन्हा एकदा पेटनयाची चिन्ह दिसत आहेत.