‘खंडणी सम्राट.. हाय हाय’; विधिमंडळात मुंडेंविरोधात भाजपची जोरदार घोषणाबाजी

dhananjay munde scam

टीम महाराष्ट्र देशा- लोकशाहीच मंदिर समजले जाणाऱ्या विधिमंडळात चालत असणाऱ्या दलालीमुळे राज्यातील राजकारणात मोठ वादळ निर्माण झाल आहे. विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावरील कथित ऑडिओ क्लीपमुळे गुरुवारी सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. आक्रमक झालेल्या भाजप आमदारांनी ‘धनंजय मुंडे… हाय हाय’, ‘खंडणी सम्राट.. हाय हाय’ अशा घोषणा देत मुंडे यांच्या निलंबनाची मागणी केली. दरम्यान, ऑडिओ टेप म्हणजे पुरावा असून विधिमंडळाच्या सदस्यावर दलालीचे आरोप होत असतील तर या प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांमार्फत चौकशी करा, अशी मागणीही भाजपकडून करण्यात आली.

सभागृहाचे नियमित कामकाज सुरू होताच भाजपच्या सदस्यांनी वेलमध्ये धाव घेत ‘धनंजय मुंडे.. हाय हाय’च्या घोषणांनी सभागृह दणाणून सोडलं. फलक दाखवत त्यांच्या निलंबनाची मागणी सुरु केली. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सभागृहाचे कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब केले. त्यानंतर पुन्हा कामकाज सुरू होताच भाजप सदस्यांनी पुन्हा वेलमध्ये धाव घेतली व घोषणाबाजी सुरू केली. भाजप आमदार अनिल गोटे यांनी धनंजय मुंडे यांच्याविषयीची ऑडिओ क्लीप टीव्हीवर प्रसिद्ध झाल्याचे सांगत ही देशाला हादरवणारी घटना आहे. विधान परिषदेत लक्षवेधी विचारण्यासाठी पैसे घेतले जात आहेत, असा गंभीर आरोप त्यांनी केला.

Loading...

काय आहे प्रकरण
वसई –विरारमधील ग्लोबल सिटी प्रकरणात करोडो रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणात शिवसेनेचे नगरसेवक असणारे धनंजय गावडे यांनी माहिती अधिकारात माहिती मागवून तब्बल १९ कोटींची सेटलमेंट केल्याची माहिती खुद्द यामध्ये मध्यस्थ असणाऱ्या प्रमोद दळवी नामक व्यक्तीने दिली आहे. याच घोटाळ्या संबंधीचा प्रश्न अधिवेशनात येणार होता. आता हा प्रश्न विचारला जाऊ नये यासाठी २ कोटींची अजून एक सेटलमेंट करण्यात आली. ज्या सेटलमेंटमध्ये विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांना ५० लाख रुपये तर आमदार अनंत ठाकूर, राष्ट्रवादीचा एक कार्यकर्ता, मंत्रालयातील काही अधिकारी आणि वसई विरार महापालिकेतील अधिकाऱ्यांना उरलेले दीड कोटी देण्यात आल्याच दळवी यांनी सांगितल आहे. दरम्यान या सर्व सेटलमेंटबद्दलच्या ऑडियो देखील पुढे आल्या आहेत.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

पंतप्रधान मोदी छत्रपती शिवाजी तर शहा तानाजींच्या रुपात; शिवसेनेच्या ढाण्या वाघाची पहिली प्रतिक्रिया
बाळासाहेब थोरातांचा स्वबळाचा नारा
कोणाशीही आणि कशीही युती करेन पण एकदा दिल्लीला जाणारच : महादेव जानकर
मुस्लिमांच्या आग्रहामुळे शिवसेनेसोबत सत्ता स्थापन केली?
'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
तर शिवसेनाही स्वबळावर लढायला तयार; सर्व ११५ जागा लढवणार
मंत्री अशोक चव्हाण यांचा खरा चेहरा उघड; रयत क्रांतीकडून टीका
कोकणातलं राजकारण पेटलं;नाईक - राणे भिडले
तुम्ही काय केलं ते आधी सांगा;शिवेसेनेचा देवेंद्र फडणवीसांना सवाल
मुंबईची माहिती नाही तेच 'नाईट लाईफ'ला विरोध करत आहेत - प्रकाश आंबेडकर