गोमांस खाणारे नेहरू हे पंडित असूचं शकत नाही; भाजप आमदाराची मुक्ताफळे

जयपूर :  कॉंग्रेसवर टीका करण्याच्या नादात पुन्हा एकदा भाजपा आमदाराची जीभ घसरली, गोमांस खाणारे जवाहरलाल नेहरू हे कधी पंडित असूच शकत नाही असं या भाजपा आमदाराने म्हंटलं आहे. ज्ञानदेव आहुजा असं या आमदाराचे नाव आहे.

आहुजा पुढे बोलताना म्हणाले की,राहुल गांधी कधी इंदिरा गांधींसोबत मंदिरात गेले होते का?, काँग्रेस नेत्यांनी हे सिद्ध करावे, मी पदाचा राजीनामा देण्यास तयार आहे, तसेच जवाहरलाल नेहरू हे गोमांस खायचे, मग अशी व्यक्ती पंडित कशी काय असू शकते?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

राहुल गांधी हे राजस्थान दौऱ्यावर जाणार असून या दौऱ्यात ते राज्यातील महत्त्वाच्या मंदिरांमध्ये जाणार आहे. यावरुन भाजपाने राहुल गांधींवर टीका केली होती. भाजपाच्या टीकेला प्रत्युत्तर देताना काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी म्हटले होते की,राहुल गांधींना आजी इंदिरा गांधी आणि जवाहरलाल नेहरू यांच्याकडून देवळात जाण्याची शिकवण मिळाली होती.

दरम्यान सचिन पायलट यांच्या या विधानाचाही अहुजा यांनी समाचार घेतला. ‘मी ७८ वर्षांचा आहे. मला अजूनही नीट आठवतं की राहुल गांधी कधीही इंदिरा गांधींसोबत देवळात गेले नव्हते. माझा हा दावा खोटा असल्याचे सचिन पायलट किंवा अन्य काँग्रेस नेत्यांनी सिद्ध करावे, मी पदाचा राजीनामा देईन, असे आव्हानच त्यांनी दिले.

मोदी माझ्या डोळ्यात डोळे घालून बघू शकत नाहीत ;राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

देशाच्या इतिहासातील अविस्मरणीय क्षण; राहुल गांधींची पंतप्रधान मोदींना ‘जादू कि झप्पी’

Loading...