भाजप आमदाराची राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला कार्यकर्त्याला अमानुष मारहाण

टीम महाराष्ट्र देशा : पाण्यासाठी दाद मागणाऱ्या महिलेला भाजप आमदाराकडून भर रस्त्यात लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गुजरातमधील नरोडाचे आमदार बलराम थवानी यांनी पाण्यासाठी दाद मागणाऱ्या महिलेला अमानुषपणे मारहाण केली आहे.

नीतू तेजवानी असं महिलेचं नाव असून, त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभागप्रमुख आहेत. त्या पाण्यासाठी आंदोलन करत होत्या. तर भाजप आमदार आमदार बलराम थवानी यांनी नीतू तेजवानी यांना भर रस्त्यात लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तिथे उपस्थित असलेल्या सामान्य नागरिकांनी या घटनेचा व्हिडीओ काढला आणि हा व्हिडीओ वायरल केला.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आमदारानं घटनेवर माफी मागितली आहे. तर त्या महिलेने माझ्यावर आधी हल्ला केला असल्याचा उलटा कांगावा केला आहे.