fbpx

महाजनांनी माझा घात केला; अशोक पाटलांचा आरोप

जळगावातील भाजपचे विद्यमान खासदार अशोक पाटील यांनी गिरीश महाजानांविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. महाजन यांनी घात केल्याची सल अशोक पाटील यांनी बोलून दाखवली आहे. मतदारसंघात माझे चांगले काम आहे. सलग दोन वेळेला मी भरघोस मतांनी विजयी झालो होतो, तरीही माझं तिकीट कापलं जाणं, हा माझ्यावर मोठा अन्याय आहे, अशा भावना अशोक पाटील यांनी व्यक्त केल्या.

गिरीश महाजनांनी जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्या मदतीने माझा घात केला, असा आरोपही पाटलांनी केला. भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर पारोळ्यात झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.

भाजपकडे अजूनही वेळ आहे, त्यांनी माझ्या नावाचा विचार करावा. कार्यकर्त्यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना ट्वीट करुन जळगाव लोकसभा मतदारसंघातील उमेदवार बदलण्याची मागणी करावी, असं आवाहनही अशोक पाटलांनी कार्यकर्त्यांना केलं आहे.