भाजपचे बंडखोर आमदार उद्धव ठाकरेंच्या भेटीला

uddhav thackeray

टीम महाराष्ट्र देशा : नाणार प्रकल्पावरून भाजप आणि शिवसेनेचे सबंध चांगलेच विकोपाला गेले असतानाच बंडखोर आमदार आशिष देशमुख आज संध्याकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे. संध्याकाळी साडे सहाच्या सुमारास मातोश्रीवर ही भेट होण्याची शक्यता आहे. कोकणातील नाणार येथे नियोजित असलेला तेलशुद्धिकरण प्रकल्प स्थानिकांचा विरोध असल्यास हा प्रकल्प विदर्भाला द्यावा, असे पत्र देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले होते. त्या पार्श्वभूमीवर ही भेट होत असल्याने या भेटीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहेत.

उद्धव ठाकरे यांनी नुकत्याच केलेल्या नाणार दौऱ्यादरम्यान एका सभेला संबोधित करताना हा प्रकल्प कोकणात न उभारता विदर्भ किंवा गुजरातला नेण्याचे आवाहन केले होते. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी आशिष देशमुख यांच्या मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राचा उलेखही केला होता. दरम्यान, आज हे दोन्ही नेते भेटणार असल्याने त्यांच्या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा होते. याकडे सगळ्या राज्याचे लक्ष लागले आहे.