…तर मी बंडखोरच – भाजप आमदार आशिष देशमुख

टीम महाराष्ट्र देशा: जर सत्य बोलणे म्हणजे बंडखोरी असेल, तर मी बंडखोरच आहे अस वक्तव्य भाजपचे विदर्भातील आमदार आशिष देशमुख यांनी केल आहे. वेगळ्या विदर्भाची मागणी करत भाजप आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी आज नागपूर येथील ऐतिहासिक दीक्षाभूमीपासून आत्मबळ यात्रा काढली होती.

Loading...

दरम्यान, बंडाच्या पवित्र्यात असलेल्या आशिष देशमुखांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रामुळे पक्षाकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. आता “विदर्भाच्या जनतेने सरकार बदललं, पक्ष बदलला, मात्र विदर्भातील शेतकऱ्यांच्या आयुष्यात काहीच बदल झाला नाही. बेरोजगारीच्या दृष्टीने तरुणांचे प्रश्न सुटले नाहीत.” असे म्हणत आपल्या बंडाच्या चर्चेंना अजूनच वाव दिला आहे.Loading…


Loading…

Loading...