मुंबई : मालाड येथील क्रिडांगणाला दिलेल्या टिपू सुलतान नावामुळे सध्या मोठा वाद उद्भवला आहे. भाजपाने टिपू सुलतान यांच्या नावाला विरोध केल्यानं महाविकास आघाडीचे नेते भाजपाविरुद्ध आक्रमक झाले आहेत. त्यातच भाजप आमदार अमित साटम यांनी टिपू सुलतान यांच्या नावाला पाठिंबा दिल्याचं जुनं पत्र व्हायरल झालं आहे. त्या पत्राविरोधात आता आमदार अमित साटम (BJP Ameet Bhaskar Satam) यांनी पोलिसांना पत्र पाठवून महापौर किशोरी पेडणेकर, पालकमंत्री अस्लम शेख यांच्याविरोधात तक्रार नोंदवली आहे.
भाजप आ. साटम यांनी जुहू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर शिरसाट यांना तक्रार अर्ज दिला आहे. साटम या तक्रार अर्जात म्हणतात, “मी आपले लक्ष मुंबई महानगरपालिकेचे चिटणीस कार्यालय व मुंबईच्या महापौरांकडून केलेल्या फोर्जरी (कागदपत्रांची छेडछाड) कडे वेधू इच्छितो. काल एक कागद मुंबईचे महापौर किशोरी पेडणेकर व महाराष्ट्र राज्याचे मंत्री असलम शेख यांच्या तर्फे व्हायरल करण्यात आला होता, ज्यामध्ये २७ डिसेंबर २०१३ रोजी झालेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सभेमध्ये एम/पूर्व विभगातील एका रस्त्याला शहीद टिपू सुल्तान मार्ग असे देण्याच्या प्रस्तावाला मी अनुमोदन दिलेले आहे.”
मी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सुधाकर शिरसाट यांना पत्र लिहून महापौर @KishoriPednekar,महाराष्ट्र राज्याचे मंत्री @AslamShaikh_MLA व महानगरपालिकेचे चिटणीस यांनी माझ्यावर केलेले आरोप खोटे असून यांच्या विरुद्ध कागदपत्रांची छेडछाड,दिशाभूल व मानहानीचा गुन्हा दाखल करावा अशी विनंती केली. pic.twitter.com/I7rR7pEI7E
— Ameet Satam (@AmeetSatam) January 27, 2022
“मी असे नमूद करू इच्छितो की सदर कागदामध्ये भारतीय जनता पार्टीच्या उपस्थित सदस्यांची नावे ही लिहिलेली आहेत. परंतु असा कोणताही फोर्मेट हा बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये नाही व हे फिरवण्यात आलेले पत्र नव्याने तयार केलेले आहे. २७ डिसेंबर २०१३ रोजीच्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सभेचा ओरिजिनल प्रस्ताव मी आपणाकडे या पत्रासोबत जोडीत आहे. यामध्ये अनुमोदकाच्या ठिकाणी खाडाखोड करून माझे नाव अ.भा.साटम असे हाताने लिहिलेले दिसून येते.”
“या पत्रावर खाली सही व मंजूर असे लिहिलेले आहे. म्हणजेच याचा अर्थ हा होतो की सदर प्रस्तावावर खडाखोड करून माझे नाव लिहिलेले आहे व काल फिरवलेले पत्र हे पूर्णपणे खोटे व नव्याने तयार केलेले आहे. त्यामुळे मी आपणास अशी विनंती करतो की मुंबई शहराच्या महापौर किशोरीताई पेडणेकर व महाराष्ट्र राज्याचे मंत्री असलम शेख व बृहन्मुंबई महानगरपालिकेचे चिटणीस यांच्या विरुद्ध ४२०, ४९९, ५०० च्या अंतर्गत फोर्जरी (कागदपत्रांची छेडछाड), खाडाखोड, दिशाभूल व मानहानीचा गुन्हा आपण दाखल करावा व आपण केलेल्या कारवाईचा तपशील लेखी स्वरूपात मला कळवावा अशी आपणास विनंती.” असे साटम यांनी दिलेल्या तक्रारीत नमुद आहे.
महत्वाच्या बातम्या
शुद्धीवर नसलेल्या सरकारचा हा एक भरकटलेला निर्णय- प्रविण दरेकर
“गांजाप्रकरणातील अनुभवानुसार वाईनविक्रीच्या घोषणेची जबाबदारी नवाब मलिकांना दिली असावी”
“विरोधात असताना दारूला विरोध आणि सत्तेत असताना प्रोत्साहन देण्याची भाजपची रणनीती आहे का?”
दोन वर्षांच्या कालखंडानंतर पुन्हा रणंजी करंडक स्पर्धेचे नियोजन
“दोन नंबरच्या मार्गाने सत्तेत आलेल्यांना चांगले मार्ग कसे सुचतील?”, राम सातपुतेंचा हल्लाबोल