भाजप नेत्यांना झालयंं तरी काय: आमदाराने केली पालिका अभियंत्याला शिवीगाळ

amit satam bjp mla andheri west

मुंबई: अहमदनगरचा निलंबित उपमहापौर श्रीपाद छीदमचे प्रकरण ताजे असतानाच आता एका भाजप आमदाराने महापालिका अभियंत्याला अर्वाच्य शिवीगाळ केल्याचा ऑडियो समोर आला आहे.

भाजप आमदार असणारे अमित साटम यांनी मुंबई महापालिकेचे के-पश्चिम वॉर्डमधील कनिष्ठ अभियंता राठोड आणि सहाय्यक अभियंता पवार यांना शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात येत आहे,

अमित साटम हे अंधेरी पश्चिमचे भाजप आमदार आहेत. दरम्यान, हे सर्व प्रकरण समोर येताच ‘तो मी नव्हे’ची भूमिका घेतली असून फोनवरील संभाषणाचा सुरुवातीचा आवाज आपला आहे, मात्र शिवीगाळ ऐकू येत असलेलाला भाग एडिट करुन व्हायरल केल्याचा दावा अमित साटम यांनी केला आहे.