fbpx

भाजपचे मंत्री हपापल्यासारखे भ्रष्टाचार करायला लागले- धनंजय मुंडे

dhanjay mundhe

टीम महाराष्ट्र देशा-  भाजपचे मंत्री हपापल्यासारखे भ्रष्टाचार करायला लागले आहेत. एक मंत्री म्हणतात वर्षभरात सरकार बदलणार घ्या उरकून. आमच्या मराठवाड्यात एक म्हण आहे, नवसानं मूल झालं आणि मुके घेऊन मेलं. अशीच १५ वर्षांच्या नवसाने मिळालेली सत्ता भाजपला राखता येत नाही. असं ट्विट धनंजय मुंडे  यांनी केलं आहे.

मुख्यमंत्र्यांच्या मंत्रीमंडळातील मंत्र्यांचा भ्रष्टाचार प्रचंड बोकाळला आहे, मुख्यमंत्र्यांनी वेळीच भ्रष्टाचारी मंत्र्यांना आवारावे अन्यथा जनता तुमची गय करणार नाही असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी वसमत येथील सभेत दिला.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या हल्लाबोल आंदोलनानिमित्त आयोजित सभेत ते बोलत होते. पुढे बोलताना मुंडे म्हणाले की मी विधिमंडळात अनेकवेळा या भ्रष्टाचारी मंत्र्यांचा पर्दाफाश केला आहे. मुख्यमंत्र्यांनाही याची कल्पना वेळोवेळी दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी जर या मंत्र्यांना आवर घातला नाही तर नवसाने मुल जन्मले आणि मुके घेऊन मेले अशी म्हणण्याची वेळ मुख्यमंत्र्यांवर यईल.

माझे सरकार या ई-पोर्टलवर पतंजलीची सर्व उत्पादने मिळणार. आतातर तहसीलदाराकडे उत्पन्नाचा दाखला घ्यायचा असेल तर आधी पतंजलीची उत्पादने घ्यावी लागणार, मगच दाखला मिळेल, असं दिसतंय, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे यांची सरकारवर उपहासात्मक टीका.

भाजपचे सरकार हे फसवणूक करणारे सरकार आहे. लठ्ठपणा कमी करण्याबाबतच्या फसव्या जाहिराती टिव्हीवर जनतेने पाहिल्या असतील. आधी मी खुप लठ्ठ होतो. मग मी सोना बेल्ट घेतला आणि बारीक झालो.. अशा फसव्या जाहीराती टिव्हीवर तुम्ही पाहिल्या असतील. अशाच प्रकारच्या जाहिराती भाजपने केल्या. आता जनतेला कळून चुकले आहे की ती आपली चूक होती. अश्या शब्दात धनंजय मुंडे यांनी भाजप सरकारच्या जाहिरातीवर टीका केली.