fbpx

शिवसेनेशी युती कोणत्याही परिस्थितीत होणारचं : सुभाष देशमुख

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका ह्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. भाजपनेही निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली आहे. शिवसेना हा आमचा मित्र पक्ष आहे. कोणत्याही परिस्थितीत आमची युती होणारच आहे, त्यात काही शंका नाही. काही नेत्यांचे मतभेद हे होत असतात यावर मार्ग काढून नेत्यांचे मतभेद मिटवून तोडगा काढून युती होईलच, असा विश्वास सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी व्यक्त केला.

सहकारमंत्री सुभाष देशमुख हे सांगलीमध्ये महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या बेघर निवारा केंद्राच्या उदघाटनासाठी आले असता बोलत होते. यावेळी खा. संजयकाका पाटील, आमदार सुधीरदादा गाडगीळ, महापौर संगीता खोत, आयुक्त रवींद्र खेबुडकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

1 Comment

Click here to post a comment