मोठ्या देशात बलात्काराच्या एखाद-दुसऱ्या घटना घडतातच ; भाजप नेत्याने तोडले अकलेचे तारे

टीम महाराष्ट्र देशा : बलात्काराच्या घटना थांबवता येऊ शकत नाहीत, त्यामुळे एवढ्या मोठ्या देशात बलात्काराच्या एखाद-दुसऱ्या घटना घडल्या, तर त्याचं अवडंबर माजवू नका, असं संतापजनक वक्तव्य भाजपचे केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री संतोष गंगवार यांनी केलं आहे. कठुआ आणि उन्नाव बलात्काराच्या पार्श्वभूमीवर गंगवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे मोठे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

‘अशा घटना दुर्दैवी परिस्थितीत घडतात. सरकार याबाबत योग्य ती पावलं उचलत आहे’ असं गंगवार म्हणाले. जम्मू आणि काश्मिरमधील कठुआत चिमुरडीवर झालेल्या सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणावर संतोष गंगवार प्रतिक्रिया देत होते.

You might also like
Comments
Loading...