fbpx

भाजपने केला विरोधकांचा हिशोब चुकता, भाजप नेत्यांचं विरोधकांवर टीकास्त्र

raosaheb danve

टीम महाराष्ट्र देशा : भाजपाच्या ३८व्या स्थापना दिनानिमित्त मुंबईमध्ये झालेल्या मेळाव्यात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा,केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे ,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकात पाटील यांनी आक्रमक भाषण करत विरोधकांवर जोरदार शरसंधान केलं आहे. कॉंग्रेस राष्ट्रवादीने केलेला भ्रष्टाचार, वाढता जातीयवाद आदी मुद्द्यांवरून विरोधी पक्षांना चांगलंच घेरलं .

वाचा आजच्या मेळाव्यात कोण काय बोललं ?
शरद पवारांनी इंजेक्शन दिल्यावरच राहुल गांधी बोलतात ! – अमित शहा
शरद पवारांनी इंजेक्शन दिल्यावरच राहुल गांधी बोलतात असे म्हणत अमित शहा यांनी राहुल गांधीसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर टीका केली. यावेळी बोलताना अमित शाह म्हणाले की, भाजप आरक्षण कधीच बंद करणार नाही, तसा कुणी प्रयत्न केला तरी तो यशस्वी होऊ देणार नाही. राहुल बाबा मोदींना साडे चार वर्षांचा हिशोब मागतात, जनता तुम्हाला चार पिढ्यांचा हिशोब मागत आहे अशी टीका सुद्धा अमित शहा यांनी राहुल गांधी यांच्यावर केली आहे.

शिवाजी पार्कवर या आम्ही किती काम केलं हे दाखवतो ; गडकरींच राज ठाकरेंना आव्हान
नितीन गडकरी हे साबणाच्या फुग्याप्रमाणे घोषणा करत असल्याची खरमरीत टीका राज ठाकरेंनी केली होती त्याला उत्तर देत जे ५० वर्षांत नाही केलं ते पाच वर्षात करुन दाखवलं. शिवाजी पार्कवर या आम्ही किती काम केलं हे दाखवतो असे नतीन गडकरी यांनी राज ठाकरेंना आव्हान केलं आहे.

सत्तेसाठी एकत्र आलेले लांडगे आमचं काहीही वाकडं करू शकणार नाहीत- मुख्यमंत्री
भाजपाच्या ३८व्या स्थापना दिनानिमित्त मुंबईमध्ये झालेल्या मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भाषण करत विरोधकांवर जोरदार शरसंधान केलं आहे. सगळे लांडगे आता सत्तेच्या शिकारीसाठी एकत्र आले आहेत. पण हे लांडगेच उद्या दंगली घडवतील, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

आमचा सिंहांचा पक्ष आहे, त्यामुळे हे लांडगे आमचं काहीही वाकडं करू शकणार नाहीत. विरोधकांनी हल्लाबोल यात्रा नव्हे, तर डल्ला मारो यात्रा काढली होती. भाजपाला नेहमीच ब्राह्मणांचा पक्ष म्हणून हिणवलं गेलं. देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळेच भविष्य आहे. संविधानात दिलेलं आरक्षण कुणीही हिरावून घेऊ शकत नाही, असंही मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

हल्लाबोल करणा-यांनी आधी स्वतःचा गल्ला भरला – चंद्रकांतदादा पाटील
वांद्रे-कुर्ला संकुलातल्या महामेळाव्याच्या निमित्तानं भाजपानं जोरदार शक्तिप्रदर्शन केलं आहे. दरम्यान, कधी शिवसेनेची बाजू न घेणाऱ्या दादांनी अचानकपणे शिवसेनेची बाजू घेतली. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, शिवसेनेला गांडूळ म्हणणारेच राज्याला लागलेली वाळवी आहे. हल्लाबोल करणा-यांनी आधी स्वतःचा गल्ला भरलाय. भुजबळांच्या बाजूला दोन-तीन कोठड्या रिकाम्या असल्याचं म्हणत चंद्रकांत पाटलांनी अजितदादांना टोला लगावला आहे.

रावसाहेब दानवे –