भाजपसाठी बुरे दिन; उत्तर प्रदेशातील भाजपचा जनाधार घटला

लखनऊ – २१०४ साली झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत देशात भाजपाला पूर्ण बहुमत मिळालं होतं. त्यामध्ये उत्तर प्रदेशाचा सर्वात मोठा वाटा होता. एकट्या उत्तरप्रदेशमधून भाजपला ८० पैकी ७२ जागा मिळाल्या होत्या. मात्र आता उत्तरप्रदेशातील भाजपचा जनाधार कमी होतं असल्याचं दिसून येतंय. एबीपी न्यूजने केलेल्या एका सर्वेनुसार, आज लोकसभा निवडणूक झाल्यास उत्तर प्रदेशात भाजपाला 80 पैकी फक्त 19 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ही भाजपसाठी चिंताजनक स्थिती आहे.

Loading...

दरम्यान लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकांमध्ये वारंवार स्वीकाराव्या लागणाऱ्या पराभवांमुळे भाजपाच्या अडचणी वाढल्या आहेत. दोनच महिन्यांपूर्वी उत्तर प्रदेशातील गोरखपूर आणि फुलपूर लोकसभा मतदारसंघात भाजपाचा धुव्वा उडाला होता. त्यानंतर काल कैराना लोकसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रीय लोक दलाच्या उमेदवारानं भाजपाला धूळ चारली. आता लोकसभेच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेल्या उत्तरप्रदेशमध्ये जनाधार वाढवण्याचं भाजपपुढे मोठं आव्हान असणार आहे.Loading…


Loading…

Loading...