भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध ; महिलांना देणार मंगळसूत्र

टीम महाराष्ट्र देशा : कर्नाटक निवडणुकीची रणधुमाळी आता शिगेला पोहचला आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या कर्नाटकात चार ठिकाणी प्रचारसभा आहेत तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि स्मृती इराणीही आज कर्नाटकात आहे. त्यामुळे कर्नाटककडे सगळ्या देशाचे लक्ष लागले आहे.

तत्पूर्वी आज सकाळी 10 वाजता भाजपचा जाहीरनामा सुद्धा प्रसिद्ध झाला आहे. या जाहीरनाम्यात 1 हजार शेतकऱ्यांना दरवर्षी मुख्यमंत्री शिष्यवृत्ती तर महिलांना मंगळसूत्रापासून ते मोफत स्मार्टफोनपर्यंत अशा अनेक घोषणांची खैरात भाजपने केली आहे.

 

भाजपच्या जाहीरनाम्यातील महत्त्वाचे मुद्दे

– 1 हजार शेतकऱ्यांना दरवर्षी मुख्यमंत्री शिष्यवृत्ती

– रायता बंधू शिष्यवृत्ती सुरू करणार, शेतकऱ्यांच्या मुलांसाठी 100 कोटी तरतूद

– 1 लाखापर्यंत कर्जमाफी करणार, पहिल्या कॅबिनेट मध्ये निर्णय घेणार

– डेअरी फार्मिंग आणि जनावरांच्या वाढीसाठी कामधेनू निधी, 3 हजार कोटींची तरतूद करणार

– दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना स्मार्टफोन देणार, मुख्यमंत्री स्मार्टफोन योजना

– राज्यात पाणीपुरवठा योजनांसाठी दीड लाख कोटींची तरतूद करणार

– दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील महिला आणि विद्यार्थीनींना फ्री सॅनिटरी नॅपकिन

– महिलांना २ लाखांपर्यंतचं कर्ज फक्त १ टक्का व्याजाने देणार

– दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील सर्व महिलांना मोफत स्मार्टफोन

– महिलांना एक रुपयांत सॅनिटरी नॅपकीन

– महिलांच्या उन्नतीसाठी १० हजार कोटींचा निधी

– भूमिहीन शेतकऱ्यांसाठी २ लाख रुपयांची विमा योजना

– अनुसूचित जमातीच्या ४०० मुलांना शिक्षणासाठी परदेशी पाठवणार

– २४x७ भ्रष्टाचारविरोधी हेल्पलाइन

– प्रत्येक तालुक्यात रनिंग ट्रॅक आणि स्वीमिंग पूल