शेतकऱ्यांना पेन्शन, १ लाखांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज, भाजपच्या जाहीरनाम्यात घोषणांचा पाऊस

bjp manifesto

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला आहे. यामध्ये भाजपकडून जनतेसाठी ७५ संकल्पांचा समावेश करण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या १२ सदस्यीय समितीने हे संकल्पपत्र बनवलेले आहे. या संकल्पपत्रातून नवीन भारत निर्माणाचा निर्धार करण्यात आल्याचं यावेळी राजनाथसिंह यांनी सांगितले आहे.

भाजपने आपल्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे, यामध्ये ६० वर्षावरील शेतकऱ्यांसाठी पेन्शन योजना सुरु करणार असल्याचं  सांगण्यात आलं आहे, तसेच शेतकऱ्यांना किसान क्रेडीट कार्डवर १ लाखांपर्यंतचे पाच वर्षासाठी बिनव्याजी कर्ज दिले जाईल, असे संकल्पपत्रात नमूद करण्यात आलं आहे.

भाजप संकल्प पत्रातील प्रमुख १० मुद्दे

१. ६० वर्षावरील शेतकऱ्यांसाठी पेन्शन योजना सुरु करणार

२. कृषी क्षेत्रातील उत्पादन वाढवण्यासाठी ३५ लाख कोटी रुपयांचा निधी

३. शेतकऱ्यांना किसान क्रेडीट कार्डवर १ लाखांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज

४. २०२२ पर्यंत देशभरात १० हजार शेतकरी उत्पादन कंपन्या स्थापन करणार

५. सर्व घटनात्मक प्रक्रियापूर्ण करून राम मंदिराचे निर्माण करणार

६. लघु उद्योगासाठी एक खिडकी योजना

७. देशातील सर्व घरांत वीज कनेक्शन देणार

८. प्रत्येक व्यक्तीला ५ किलोमीटरपर्यंत बँकिंग सेवा उपलब्द करणार

९. तीन तलाकचा कायदा बनवून मुस्लीम महिलांना न्याय देणार

१०. आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत १,५ लाख वेलनेस सेंटर उभारणार