अॅट्रॉसिटी कायद्यासंदर्भातील सुधारित विधेयक हे माणूसकी, कायदा आणि संविधानाच्या विरोधात : भाजपा आमदार

टीम महाराष्ट्र देशा – अॅट्रॉसिटी कायद्यातील मूळ तरतूद कायम ठेवणारे विधेयक संसदेत मंजूर झाल्यानंतर आता या विधेयकाला उघड उघड विरोध होऊ लागला आहे. भारतीय जनता पक्षाचे उत्तर प्रदेशमधील भाजपा आमदार सुरेंद्र सिंह यांनी सरकारविरोधी भूमिका घेतली आहे. दलितेतर समाजाने आगामी निवडणुकांमध्ये आरक्षित जागांवर ‘नोटा’चा वापर करुन निषेध करावा, असे आवाहन आवाहन करत भाजपला घरचा आहेर दिला आहे.

नेमकं काय म्हणाले भाजपा आमदार सुरेंद्र सिंह ?

‘समाजाची प्रतिष्ठा आणि हक्कांचे रक्षण करण्याची जबाबदारी माझी आहे. जनतेने मला यासाठीच निवडून दिले आहे. अॅट्रॉसिटी कायद्यासंदर्भातील सुधारित विधेयक हे माणूसकी, कायदा आणि संविधानाच्या विरोधात आहे. एखाद्या व्यक्तीला चौकशीविनाच तुरुंगात कसे टाकता येईल?, या सुधारित विधेयकाविरोधात मी लवकरच मोहीम सुरु करणार आहे. मी दलितेतर समाजाला आवाहन करतो की त्यांनी आरक्षित जागांवर नोटाचा वापर करावा. दलित स्वत:च्या पाठिंब्यावर कुठे जाऊ शकतात हे आपण बघूया.

राजनेता आणि कवी असा एक अतिशय सुंदर संगम अटलबिहारी वाजपेयी यांच्यामध्ये होता – प्रतिभा पाटील