fbpx

राज्यामध्ये पूरस्थिती तरीही सत्ताधारी भाजपची पुन्हा महाजनादेश यात्रा 

टीम महाराष्ट्र देशा: कोल्हापूर, सांगली तसेच राज्यातील अनेक भागांमध्ये अजूनही पूरस्थिती कायम आहे, पाऊसाने उसंत घेतल्याने पुराचे पाणी कमी होण्यास काहीशी सुरुवात झाली आहे. राज्यावर संकट ओढवलेले असताना सरकार ठोस उपाययोजना करत नसल्याचा आरोप केला जात आहे, यामध्ये पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनदेशा यात्रा २१ ऑगस्टपासून पुन्हा सुरु करण्यात येणार आहे. मराठवाड्यातील दुष्काळी भागात यात्रा काढण्यात येणार आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनमताची चाचपणी करण्यासाठी सत्ताधारी भाजपकडून राज्यामध्ये महाजनादेश यात्रा काढण्यात येत आहे. यात्रेचा पहिला टप्पा विदर्भात पूर्ण झालेला आहे, परंतु पश्चिम महाराष्ट्रात निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे महाजनादेश यात्रा स्थगित करण्यात आली होती. राज्यावर संकट ओढवलेले असताना देखील सत्ताधारी भाजप निवडणुकीच्या प्रचारात गुंतलेली असल्याची टीका यावेळी विरोधकांकडून करण्यात आली होती.

राज्यातील पूरस्थिती अद्याप सुरळीत झाली नसताना आणि सरकारकडून ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नसताना देखील पुन्हा एकदा महाजनादेश यात्रा सुरु करण्यात येणार आहे. २१ ऑगस्टपासून बीडमधील आष्टी मतदारसंघातून यात्रेला सुरुवात होईल. औरंगाबाद, जालना, परभणी, लातूर, उस्मानाबाद आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये यात्रा काढण्यात येणार आहे. १० दिवसांच्या दरम्यान जवळपास ३१ मतदारसंघ धुंडाळून काढले जाणार आहेत.

महत्वाच्या बातम्या