fbpx

भाजप मंत्रीच म्हणतात; जीएसटी सीएंना कळेना तर आम्हाला काय कळणार

gst

टीम महाराष्ट्र देशा: एक देश एक कर प्रणाली म्हणत मोदी सरकारने देशभरात जीएसटी लागू केला आहे. याच विषयावरून विरोधीपक्ष भाजपवर जोरदार टीका करत आहेत. यातच आता खुद्द भाजपचे मध्यप्रदेश मधील अन्न व पुरवठा मंत्री ओम प्रकाश ध्रुवे यांनी आपल्याला देखील जीएसटी समजलेले नसल्याच विधान केलं आहे. नोटाबंदीवर आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात बोलत होते.

ध्रुवे म्हणाले कि ‘मोठे व्यापारी आणि सीएंना जीएसटी समजू शकलेले नाही. तसेच मला देखील ते समजलेले नाही, त्यामुळे या विषयावर प्रतिक्रिया देणे अयोग्य असल्याचे ते म्हणाले. सध्या जटील वाटणाऱ्या कर प्रणालीची प्रक्रिया हळूहळू समजेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.