पुण्यात सत्ताधारी भाजपला दणका; पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीने राखला गड

पुणे: महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 22 मुंढवा-मगरपट्टासिटीसाठी घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला आपला गड राखण्यात यश आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार पूजा कोद्रे यांचा 3501 मतांनी विजय झाला आहे. तर महापालिकेत सत्ताधारी असणाऱ्या भाजपला पराभवाचा सामना करावा लागला.

माजी महापौर चंचला कोद्रे यांच्या निधनाने रिक्त झालेल्या प्रभाग क्रमांक 22 साठी शुक्रवारी मतदान घेण्यात आले होते. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार पूजा कोद्रे यांना 7420 मते तर शिवसेनेच्या उमेदवार मोनिका तुपे यांना 4184 मते मिळाली आहेत. भाजप उमेदवार असणाऱ्या सुकन्या गायकवाड यांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले असून त्यांना 3 हजार 307 मते मिळाली.

मुंढवा-मगरपट्टासिटीसाठी हा प्रभाग राष्ट्रवादी काँग्रेसचा गड मानला जातो. महापालिका विरोधीपक्ष नेते चेतन तुपे हे याच प्रभागातून नगरसेवक असल्याने या निवडणुकीत त्यांची प्रतिष्ठा पणाला लागल्याचं पहायला मिळाल.

You might also like
Comments
Loading...