भाजपने मोठा मित्र गमावला, त्याची किंमत त्यांना मोजावी लागेल : संजय राऊत

blank

टीम महाराष्ट्र देशा : राज्यातील सत्ता संघर्ष शिगेला गेल्यालेने भाजप शिवसेनेचे संबंध तुटले आहेत. त्यात संसदेतही शिवसेनेची एनडीएतून बाजूला काढत विरोधी बाकावर बसवण्याची व्यवस्था केली आहे. त्यामुळे शिवसेना नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. हाच धागा पकडत शिवसेना नेते खा. संजय राऊतांनी भाजपवर निशाना साधला आहे.

पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, भाजपने शिवसेनेसारखा सगळ्यात मोठा राजकीय पक्ष असलेला मित्र त्यांनी गमावला आहे, देशाच्या पुढील राजकारणामध्ये भाजपला याची फार मोठी किंमत मोजावी लागेल.तसेच भाजपला महाराष्ट्रात जागा देण्याचं, उभं करण्याचं काम हे शिवसेनेने आणि शिवसेनाप्रमुखांनी केलं आहे. त्यांनी आता जागा बदलवल्या तरी काही फरक पडत नाही, असे संजय राऊत म्हणाले.

या लोकसभा निवडणुकीत आम्ही भाजपशी युती केली नसती तर आज देशाचे चित्र काही वेगळे असते. आमची युतीत जाण्याची इच्छा नव्हती. अमित शहा मातोश्रीवर आले आणि त्यांनी लोकसभा, विधानसभेसाठी युती करावी अशी भूमिका मांडली, असेही संजय राऊत म्हणाले.

महत्वाच्या बातम्या