पालघर : दुसऱ्या फेरीनंतर भाजपा साडेचार हजार मतांनी आघाडीवर

टीम महाराष्ट्र देशा- राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या पालघर पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. भाजपा खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पालघर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. याठिकाणी 28 मे रोजी मतदान झालं होतं. शिवसेनेसह भाजपानंही या मतदारसंघातील निवडणूक प्रतिष्ठेची केल्यानं इथल्या निकालाकडे सर्वांचंच लक्ष लागलंय.

– दुसऱ्या फेरीनंतर भाजपा- 23271, बविआ- 18923, शिवसेना- 18505, काँग्रेस- 3422

– दुसऱ्या फेरीनंतर भाजपा साडेचार हजार मतांनी आघाडीवर

– पहिल्या फेरीत राजेंद्र गावित (भाजपा) 11,236, बळीराम जाधव (बविआ) 11090, श्रीनिवास वनगा (शिवसेना) 8190

– राजेंद्र गावित आघाडीवर; बविआचे बळीराम जाधव दुसऱ्या क्रमांकावर

– निवडणूक अधिकारी आणि पत्रकारांमध्ये वादावादी; पहिल्या फेरीनंतरही आकडेवारी जाहीर न केल्यानं हमरीतुमरी

– विक्रमगडमध्ये माकपा उमेदवार पुढे

– पोस्टल मतांमध्ये भाजपा आघाडीवर

– डहाणूमध्ये भाजपाचे राजेंद्र गावित पुढे
– पालघरमध्ये काँग्रेस पिछाडीवर, डिपाॅझिट जप्त होण्याची शक्यता
– पालघरमध्ये राजेंद्र गावित आघाडीवर, श्रीनिवास वनगा तिसऱ्या स्थानावर