भाजप नेतेही चिंतेत; वांग्यांच्या पिकावर फिरवला ट्रॅक्टर

वांग्याला बाजारात केवळ तीन ते पाच रुपये किलोचा भाव

हिंगोली: माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी शेतकरी आंदोलनात सहभाग घेत भाजपला घराचा आहेर दिला आहे. शेतकऱ्यांमध्ये भाजपविरोधात नाराजी असून राज्यात १ जून पासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनात राजकीय नेते, विरोधी पक्षांसोबत आता सत्ताधारी भाजपने सुद्धा उडी घेतली आहे.

शेतमालाला योग्य हमीभाव मिळावा व अन्य मागण्यांसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. दरम्यान, हिंगोलीचे माजी खासदार तथा भाजप नेते सुभाष वानखेडे यांनी आपल्या शेतातील पाच एकरवर असलेल्या वांग्यांच्या पिकावर ट्रॅक्टर फिरवून पीक उद्ध्वस्त करुन टाकले.

वांग्याला बाजारात केवळ तीन ते पाच रुपये किलोचा भाव मिळत असल्यामुळे वानखेडे यांनी सोमवारी वांग्याच्या पिकात ट्रॅक्टर घालून वांग्याची रोपे उपटून टाकली. त्यामुळे आता भाजपनेतेही वैतागले आहेत. कांद्याला जास्तीत जास्त पाच रुपये किलो भाव मिळत असल्याने लागवड आणि वाहतुकीचा देखील खर्च निघत नाही. त्यामुळे संतप्त वानखेडे यांनी ट्रॅक्टरद्वारे वांग्याचे पाच एकर शेत नांगरुन टाकले.

You might also like
Comments
Loading...