केंद्राचं कसलं पॅकेज ! आमचं पॅकेज बघून भाजप नेते डोळे पांढरे करतील : मुश्रीफ

hasan musharif

मुंबई : राज्यात कोरोनाने भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे केंद्रा प्रमाणे राज्य सरकारने देखील 50 हजार कोटींचे पॅकेज जाहीर करावे अशी मागणी भाजपने केली आहे. यासाठी भाजपने काल माझं अंगण, माझं रणांगण असा नारा देत राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन देखील केले. यावर आता राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ते म्हणाले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार लवकरच मोठं पॅकेज जाहीर करेल. जेव्हा हे पॅकेज जाहीर होईल तेव्हा भाजप नेत्यांचे डोळे नक्कीच पांढरे होतील. केंद्राने 20 लाख कोटी जाहीर केलं मात्र हे कसलं पॅकेज आहे? सगळं कर्जच आहे. पेंडिंग आणि लेंडिंग यामध्ये खूप मोठा फरक आहे. याचा लोकांना काहीही फायदा नाही. मात्र आमचं महाराष्ट्र सरकार बारा बलुतेदार आणि श्रमिकांना असं मोठं पॅकेज देईल की भाजपचे डोळे पांढरे होतील, असे हसन मुश्रीफ म्हणाले. तसेच भाजप केवळ राज्य सरकार अडचणीत कसे येईल याचा प्रयत्न करत आहे, असेही ते म्हणाले.

दरम्यान मेरा अंगण मेरा रणांगण असा नारा देत भाजपने काल राज्य सरकारच्या विरोधात महाराष्ट्र बचाओचे आंदोलन केले. यावेळी भाजपने वाढत्या कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात राज्य सरकार अपयशी ठरले असल्याची टीका केली. तसेच राज्यावर एवढे भीषण संकट आले असतानाही राज्य सरकार पैसा खर्च करण्यास तयार नाही, असा घणाघात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.

राज्य केंद्राच्या परवानगीनुसार जीडीपीच्या 5 टक्के कर्ज घेऊ शकतं. असे असतानाही राज्य सरकार प्रयत्न करत नाही. एकीकडे केंद्राने 20 लाख कोटी रुपयाचं पॅकेज जाहीर केलं, पण राज्य सरकारने एक दमडीचंही पॅकेज दिलं नाही, असेही फडणवीस म्हणाले.

शक्तिकांत दास सरकारला आर्थिक उपाययोजना करण्यास का सांगत नाहीत : पी. चिदंबरम

#corona : रेल्वेचा मोठा निर्णय ! स्थानकावरील दुकानांना व्यवसाय करण्यास परवानगी