विचित्र वक्तव्य करून भाजप नेते आपली संस्कृती दाखवण्याचा प्रयत्न करतायत; जयंत पाटलांची टीका

jayant patil

मुंबई : भाजपचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादीवर टीका करताना वादग्रस्त वक्तव्य केले. यावरून आता त्यांच्यावर टीकेचा भडिमार सुरू आहे. पुण्यातल्या एका कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादीच्या धोरणांवर टीका करताना प्रवीण दरेकर यांनी आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याने वाद निर्माण झालाय.

काल शिरुरमध्ये प्रवीण दरेकर यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी केलेल्या भाषणादरम्यान दरेकर बोलता बोलता भलतंच बोलून गेले. राष्ट्रवादी रंगलेल्या गालांचा मुका घेणारा पक्ष आहे, असं वक्तव्य त्यांनी केलं. यानंतर राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने दरेकर यांच्यावर हल्लाबोल केला असून माफी मागितली नाही तर गाल लाल करण्यात येईल असा आक्रमक इशारा देखील देण्यात येत आहे.

दरम्यान, या व्दारव राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे मंत्री जयंत पाटील यांनी देखील दरेकर यांच्या विधानाचा समाचार घेतला आहे. ‘भारतीय जनता पक्षाचे नेते वेगवेगळे विचित्र वक्तव्य करत असतात. त्यातून ते त्यांची संस्कृती दाखवण्याचा प्रयत्न करतात. महिलांबाबत अशी विधानं करणं अत्यंत गैर आहे. त्यामुळे त्यांचा जितका निषेध करता येईल तो कमी आहे. ते असं कसं बोलू शकतात हाच प्रश्न आहे. त्यांच्या पक्षात तशी पद्धत असेल. आम्ही अशी टोकाची विधानं करत नाही, अशा वक्तव्याना वारेमाप प्रसिद्धी मिळते हे दुर्दैवी आहे,’ अशी खंत देखील जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या