पराभवानंतर भाजपा नेत्यांना वाजपेयींच्या कवितांची आठवण

टीम महाराष्ट्र देशा – काल जाहीर झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला मोठा धक्का बसला आहे. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या तिन्ही राज्यातील सत्ता गमावली आहे. पराभवानंतर प्रतिक्रिया देताना भाजप नेत्यांना माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कवितांची साथ घ्यावी लागली आहे.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आपल्या पदाचा राजीनामा राज्यपालांच्या कडे सुपूर्त केला, त्यांनतर आपली प्रतिक्रिया देताना शिवराज सिंग यांनी ‘ना हार मे, ना जीत मे, किंचित नही भयभीत मै, कर्तव्य पथ पर जो भी मिले, ये भी सही वो भी सही’ या कवितेच्या ओळी म्हणल्या आहेत. सोशल मीडियात देखील भाजपा कार्यकर्त्यांनी पराभवानंतर प्रतिक्रिया लिहताना अटलबिहारी यांच्या ओळी कवितांची साथ घेतली आहे. “सत्ता का खेल तो चलता रहेगा, सरकारे आयेगी जायेगी” अश्या शब्दात आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.