fbpx

‘भाजपा नेत्यांसाठी वेड्यांचे हॉस्पिटल सुरू करण्याची गरज’

टीम महारष्ट्र देशा – भाजपा नेत्यांचा सुरू असलेला वाचाळपणा पाहता त्यांच्यासाठी आता मोफत वेड्यांची हॉस्पिटल सुरू करण्याची गरज आहे. अशा शब्दात विधान परिषदचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पुनम महाजन आणि भाजपच्या नेत्यांवर टीका केली आहे. मुंडेंनी यासंबंधी ट्विट केलं आहे.

पुनम महाजन यांनी ज्येष्ठ नेते शरद पवारांवर यांच्यावर केलेली टीका निषेधार्ह आहे. महाराष्ट्राची ही राजकीय संस्कृती नाही, पवार साहेबांवर टीका करणारे राजकीय दृष्ट्या संपून गेले आहेत, हे त्यांनी लक्षात ठेवावे, असे म्हणत मुंडे यांनी ट्विटच्या माध्यमातून पुनम महाजन यांच्यावर निशाना साधला आहे.

भाजपाच्‍या खासदार पूनम महाजन यांनी शरद पवार यांच्‍या संदर्भात केलेल्‍या वादग्रस्‍त वक्‍तव्‍याचे राष्‍ट्रवादी काँग्रेसमध्ये तीव्र पडसाद उमटत आहेत. विधान परिषदचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पूनम महाजन यांच्‍या वक्‍तव्‍याचा निषेध केला आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची तुलना रामायणातील मंथरा आणि महाभारतातील शकुनी मामा आहेत, तर काँग्रेसने प्रियांकांचे इतके फोटो पसरवले, की ती तैमूर अली असल्यासारखीच वाटत होती, अशी टीका भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षा आणि मुंबईतील भाजपच्या विद्यमान खासदार पूनम महाजन यांनी मुंबईतील सोमय्या मैदानावर आयोजित भाजयुमोच्या सीएम चषक पारितोषिक वितरण सभारंभात केली होती.