मुंबई : होऊ घातलेल्या उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीमुळे देशभरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दलिताच्या घरी जेवल्याचे काही फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत. यावर आजच्या सामना आग्रलेखातून शिवसेना खासदार तथा सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
राऊत लिहितात, भाजपच्या पुढाऱ्यांनी आजही दलितांकडे दलित म्हणून जेवणाचे कार्यक्रम करून त्याचा बोभाटा करावा लागतो याचा सरळ अर्थ असा की, त्यांच्या मनात ‘जात’ आहे व ती जात घालवायची त्यांची तयारी नाही. आज साराच देश राजकीय फायद्या- तोट्यासाठी जातीय चौकटीत वाटला गेला आहे. त्यामुळे जातीपातीचे निर्मूलन हे थोतांड ठरले आहे. जातीस महत्त्व देऊन मुख्यमंत्री, पंतप्रधान जेवणावळीचा कार्यक्रम करतात. मनातून जात जायला तयार नाही आणि निघालेत सामाजिक परिवर्तन घडवायला!
योगी आदित्यनाथ यांनी दलिताच्या घरी जेवण घेतल्याची छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. गोरखपूरचे खासदार मनोज तिवारी यांनीही त्याच वेळी दलिताघरी जेवण घेतल्याचे छायाचित्र प्रसिद्ध केले आहे. दलिताला दलित म्हणून हिणवण्याचा हा राजकीय प्रकार आहे. हरिशंकर परसाई यांनी एकदा स्पष्टच सांगितले होते, ते त्यांच्याच शब्दांत देतो, ”याद रहे, ‘जगजीवनराम’ को ‘उमाशंकर दीक्षित’ के साथ एक साथ डिनर खिलाने से कोई सामाजिक परिवर्तन नहीं होता.” गेल्या काही वर्षांपासून भाजप पुढाऱ्यांचा हा नवा सामाजिक परिवर्तनाचा फॉर्म्युला समोर आला आहे.
पंतप्रधान मोदी यांनी कुंभमेळय़ात गंगास्नान केले व नंतर काही दलितांचे पाय वगैरे धुतल्याचे ‘नाट्य’ घडवले. त्यामुळे दलित, मजूर, सफाई कामगारांचे प्रश्न उत्तर प्रदेशात तरी सुटले काय? खास दलितांच्या घरी जेवण्याचा कार्यक्रम घडवणे म्हणजे दलितांच्या बाबतीत आपली वेगळी भूमिका आहे हे स्पष्ट करण्यासारखेच आहे. दलितांच्या घरी जेवायला जाणे, दलितांना सार्वजनिक कार्यक्रमांत आमंत्रित करणे हे कार्य सगळ्यात आधी कोकणातील वास्तव्यात वीर सावरकरांनी सुरू केले. एका बाजूला आपण जातीप्रथा संपविण्यासाठी सरकारी कार्यक्रम राबवायचे आणि त्याच वेळी एखादी व्यक्ती दलित आहे, अशी दवंडी पिटवून त्याच्या घरी भोजन मेळावा घ्यायचा हे उपक्रम राबविण्यात भाजपचा हात कोणी धरणार नाही. अशी टीका राऊतांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
-
जितेंद्र आव्हाडांनी घेतली किरण मानेंची बाजू म्हणाले, “वागणुकीमुळे नाही तर…”
-
किरण मानेंना मालिकेतून काढल्यानंतर स्टार प्रवाहची पहिली प्रतिक्रिया; ‘महिला नायिकांशी गैरवर्तन..’
-
औरंगाबादेत मोकाट जनावरांचा सुळसुळाट; महापालिकेची ‘ती’ घोषणा हवेतच विरली!
-
‘ही शिवसेना नव्हे, ही तर काँग्रेस सेना’; रवी राणांचा शिवसेनेवर हल्ला
-
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यासाठी परवानगी कशाला हवी? नवनीत राणांचा हल्लाबोल