fbpx

‘लोकसभेच्या तोंडावर युद्ध होणार, हे मला भाजपच्या नेत्यांनी 2 वर्षांपूर्वीच सांगितलं होतं’

अमरावती – लोकसभा निवडणुकांआधी युद्ध होणार, असे भाजपच्या एक वरिष्ठ नेत्यांनी मला 2 वर्षांपूर्वीच सांगितलं होते, असे खळबळजनक वक्तव्य अभिनेते आणि नेते पवन कल्याण यांनी केले आहे.

यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

पुलवामा येथे झालेल्या हल्ल्याचा बदला म्हणून केलेल्या कारवाईमुळे भारत-पाकिस्तानमध्ये युद्धासारखी स्थिती निर्माण झाली आहे. यात आंध्र प्रदेशातील एका नेत्याच्या वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे.

जन सेना पक्षाचे अध्यक्ष असलेले पवन कल्याण हे भाजपचे मित्रपक्ष होते. मात्र आता या पक्षाने भाजपची साथ सोडली आहे. पवन कल्याण हे दक्षिणेतील प्रसिद्ध कलाकार असून ते अभिनेता चिरंजीवीचे बंधू आहेत.