राज्यातील सत्ता गमावली; आता महाराष्ट्रातील भाजपनेते जाणार दिल्ली निवडणुकीत प्रचारासाठी

टीम महाराष्ट्र देशा : दिल्ली निवडणुकीची तारीख जवळ आल्यानंतर आता रंगत वाढत चालली आहे. विविध पक्षांनी आपले उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आता लक्ष प्रचारसभांच्या नियोजनावर लागले आहे. दिल्ली विजयासाठी भाजपने कंबर कसली असून महाराष्ट्रातील नेत्यांवर विशेष जबाबदारी देण्यात आली आहे.

आजपासून महाराष्ट्रातील भाजप नेते दिल्ली विधानसभा निवडणूक प्रचारात सहभागी होणार आहेत. राज्यातून एकूण 25 जणांवर दिल्ली निवडणुकीची जबाबदारी दिली जाणार असून देवेंद्र फडणवीस आणि विनोद तावडे आजपासूनच दिल्लीला प्रचारासाठी रवाना होणार आहेत. तर चंद्रकांत पाटील आणि आशिष शेलार फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात दिल्लीत प्रचारासाठी जाणार आहेत.

Loading...

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विनोद तावडे हे दोघे आजपासूनच दिल्लीत प्रचाराला सुरुवात करणार आहेत. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि आशिष शेलार फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात दिल्लीत प्रचारासाठी जाणार आहेत.भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनाही दिल्लीत निवडणुकीची जबाबदारी दिली आहे. तर, प्रवीण दरेकर, संजय कुटे, सुरजित सिंघ ठाकूर यांचाही निवडणूक प्रचारात समावेश करण्यात आला आहे. राज्यातील प्रत्येक नेत्याकडे एकूण 10 विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी वाटून देण्यात आली आहे.

सुरुवातीला दिल्ली निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपने 40 स्टार प्रचारकांची नावे जाहीर केली आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय माहिती, प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर या दोन महाराष्ट्रातील नेत्यांची नावे स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश करण्यात आला होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अन्य केंद्रीय मंत्र्यांची फौज भाजपचा प्रचार करण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. यामध्ये महाराष्ट्रातून केंद्रात गेलेल्या जावडेकर आणि गडकरी या दोन नेत्यांची नावे आहेत.

दरम्यान,नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघात होणारी निवडणूक ही अत्यंत चुरशीची होणार आहे. या मतदारसंघातून दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे उमेदवार अरविंद केजरीवाल निवडणूक लढवत आहेत. काँग्रेसने रोमेश सभरवाल यांना उमेदवारी दिली आहे. तर भाजपने या मतदारसंघातून भाजपच्या युवा मोर्चाचे दिल्ली अध्यक्ष सुनील यादव यांना उमेदवारी दिली आहे. यादव हे पेशाने वकील असून त्यांना उमेदवारी देऊन भाजपने अनेकांना धक्का दिल्याचं बोललं जातंय.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

टीकाकारांच्या नाकावर टिच्चून इंदुरीकर महाराजांची मोशीत काढली मिरवणूक
शिवसेनेचा 'ढाण्यावाघ' ऊझबेकिस्थानात
'पुन्हा निवडणुका झाल्यास भाजपाच्या आमदारांची संख्या १०५ वरुन पंधरावर येईल'
इंदोरीकर महाराजांच्या 'त्या' वक्तव्यावर सिंधुताई सपकाळांची लक्ष्यवेधी प्रतिक्रिया
फक्त विधानसभा कशाला लोकसभेच्या देखील निवडणुका घ्या, पवारांनी फडणवीसांना ललकारलं
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
परळीतील 'त्या' प्रकरणातील आरोपींना अटक, कोणाचीही गय केली जाणार नाही - धनंजय मुंडे
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
राजकीय भूकंपाची शक्यता ; भाजपच्या २५ नाराज आमदारांची बैठक
‘सामना’मध्ये छापून आलेल्या नाणार प्रकल्पाच्या जाहिरातीवर मुख्यमंत्री ठाकरेंनी केली भूमिका स्पष्ट, म्हणाले...