भाजप नेत्यांचा बरळण्याचा धडका सुरूच, आता म्हणे महात्मा गांधी हे पाकिस्तानचे राष्ट्रपिता

टीम महाराष्ट्र देशा : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या नथुराम गोडसेंबाबतच्या बेलगाम वक्तव्यानंतर भाजप पक्षातील अनेक नेत्यांनी साध्वीच्या सुरात सूर मिसळत बरळ्याणाचा धडका लावला आहे. साध्वीच्या माफीनाम्यानंतर भाजपच्या अनंतकुमार हेगडे आणि नलीन कतील यांनी पुन्हा एकदा गोडसेवादाला सुरवात केली. तर आता आणखी एका भाजप नेत्याने राष्ट्रपिता महात्मा गांधींविरोधात वादग्रस्त विधान करत महात्मा गांधी हे पाकिस्तानचे राष्ट्रपिता असल्याच त्यांनी म्हंटल आहे.

 

भाजपा नेते अनिल सौमित्र यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये महात्मा गांधींबाबत वादग्रस्त विधान केले आहे. ‘महात्मा गांधी राष्ट्रपिता होते, पण पाकिस्तानचे. भारतात तर त्यांच्यासारखे कोट्यवधी पुत्र होऊन गेले. काही लायक होते, तर काही नालायक होते,’ अशी वादग्रस्त पोस्ट सौमित्र यांनी केली. तसेच ‘काँग्रेसनं त्यांना राष्ट्राचं पिता केलं. राष्ट्राचा कोणीही पिता नसतो, तरराष्ट्राचे पुत्र असतात. असे सौमित्र यांनी आपल्या पोस्ट मध्ये लिहिले आहे.

दरम्यान साध्वी प्रज्ञासिंह हिने नथुराम गोडसेला देशभक्त म्हणत वादाला प्रारंभ करून दिला. त्यानंतर साध्वींच्या या वक्तव्याचा भाजपकडून निषेध करण्यात आला. तर यासंबंधी साध्वीला पक्षाने माफी देखील मागायला लावली. या माफीनाम्यामुळे शांत होत असलेला वाद अनंतकुमार हेगडे आणि नलीन कतील यांनी पुन्हा एकदा चर्चेत आणला. त्यामुळे या नेत्यांच्या वक्तव्यांची दखल पक्षाच्या शिस्तपालन समितीने घेतली आहे. तर पंतप्रधान मोदी यांनी देखील साध्वी प्रज्ञाच्या वक्तव्यावर भाष्य केले आहे. साध्वीने माफी मागितली असली तरी मी तिला माफ करू शकणार नाही अशी तीव्र प्रतिक्रिया मोदी यांनी दिली आहे.