काँग्रेसचा ‘पंजा’ रद्द करण्याची भाजप नेत्याची मागणी

bjp congress logo

नवी दिल्ली: भाजप आणि काँग्रेस मध्ये नेहमीच वर्चस्वप्राप्ती वरून शाब्दिक युद्ध सुरु असते. आता लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचं हात हे निवडणूक चिन्ह रद्द करा अशी मागणी, भाजपने निवडणूक आयोगाकडे केली आहे. याबाबत दिल्ली भाजपचे प्रवक्ते अश्विनी उपाध्याय यांनी निवडणूक आयोगाकडे अर्ज केला आहे.

Loading...

निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात अश्विनी उपाध्याय यांनी म्हटले आहे, की निवडणूक आयोगाने सुरुवातीला काँग्रेसला बैलजोडी असलेले चिन्ह दिले होते. त्यानंतर काँग्रेसची फूट झाल्यानंतर निवडणूक आयोगाने गायीचे दूध पिणारे वासरू, असे काँग्रेसला निवडणूक चिन्ह दिले. पुन्हा काँग्रेसचे विभाजन झाल्यानंतर हाताचा पंजा असे निवडणुकीचे चिन्ह काँग्रेसला निवडणूक आयोगाकडून मिळाले. निवडणुकी दिवशी मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात निवडणूक चिन्हाचं प्रदर्शन करणं हे आचारसंहितेचं उल्लंघन आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने काँग्रेसचं हात हे चिन्ह रद्द करावं. उपाध्याय यांनी याबाबत सोमवारी मुख्य निवडणूक आयुक्त ओ पी रावत यांची भेट घेतली.
हाताचा पंजा हा मनुष्याच्या शरिराचा एक भाग आहे. त्यामुळे निवडणुकी दिवशी तो प्रचाराच्या हेतूने दाखवणं नियमाचं उल्लंघन आहे. तो एक प्रचाराचा भाग आहे. त्यामुळे याप्रकरणी सुप्रीम कोर्टापर्यंत लढा उभारावा लागला तरीही मागे हटणार नाही, असा पवित्रा उपाध्याय यांनी घेतला.Loading…


Loading…

Loading...