fbpx

मॉर्निंग वॉकला गेलेल्या भाजप नेत्याची ठेचून हत्या

भोपाळ : मध्य प्रदेशातील बरवानी जिल्ह्यातील बलवाडी येथे सकाळी मॉर्निंग वॉकला जाताना भाजप नेता मनोज ठाकरे याची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. यामुळे या भागात खळबळ उडाली आहे.

भाजप नेता मनोज ठाकरे हा सकाळी मॉर्निंग वॉकला गेले होते. यावेळी ही घटना घडली आहे. हे हत्या कोणत्या कारणावरून झाली आहे हे अद्याप कळू शकलेले नाही. परंतु पोलीस स्टेशनच्या आवारातच त्यांचा मृतदेह आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

मनोज ठाकरे यांची हत्या कोणत्या कारणावरुन झाली आहे याची पोलीस कसून चौकशी करत आहेत. या आधी, काही दिवसापूर्वी मंदसौर शहरात एका अज्ञात व्यक्तीकडून स्थानिक नगरपालिका अध्यक्ष प्रल्हाद बंधवार यांची गोळ्या झाडून हत्या केली गेली होती.